मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Monsoon Session : बालभारतीचं डोमेन विकण्यासाठी जाहिरात?, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Monsoon Session : बालभारतीचं डोमेन विकण्यासाठी जाहिरात?, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Jul 19, 2023, 01:50 PM IST

    • Monsoon Session : बालभारतीचं डोमेन विक्रीची जाहिरात गुगलवर देण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे.
balbhartis domain selling advertisement on google (HT)

Monsoon Session : बालभारतीचं डोमेन विक्रीची जाहिरात गुगलवर देण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे.

    • Monsoon Session : बालभारतीचं डोमेन विक्रीची जाहिरात गुगलवर देण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session : मुंबईत राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी शिंदे गट व भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यातच आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या बालभारतीचं डोमेन दोन हजार यूएस डॉलर्समध्ये विकण्याची जाहिरात गुगलवर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Gao Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

विधानसभेत बोलताना माजी मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बालभारतीचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर्समध्ये विकणे आहे, अशी जाहिरात गूगलवर झळकली. या जाहिरातीमुळे शालेय शिक्षण विभागात सुरू असलेला सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया फेब्रुवारी २०२३ मध्ये केली असताना असा गंभीर प्रकार कसा काय घडू शकतो? हा फसवणुकीचा किंवा हॅकिंगचा प्रकार आहे का? याबाबत शासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केली आहे.

सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब...

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आफताब पुनावाला प्रकरणाचा उल्लेख करत मुस्लिम समाजाची बदनामी करण्यात आल्याचं वक्तव्य सभागृहात केलं. त्यामुळं सत्ताधारी आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केलं आहे.

पुढील बातम्या