मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

Aug 31, 2023, 09:37 AM IST

    • Kokan Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Kokan Ganpati Special Train Ganeshotsav 2023 (HT)

Kokan Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

    • Kokan Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

Kokan Ganpati Special Train Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या दोन्ही रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळं या दोन्ही रेल्वेंना अतिरिक्त डबे जोडण्यात आल्याने बुकिंगला वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यापूर्वीच रेल्वेकडून जादा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. त्यामुळं आता कोणत्याही गर्दी आणि वर्दळी शिवाय चाकरमान्यांना कोकणात जाता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीएसटी ते मडगाव आणि सीएसटी ते सावंतवाडी या दोन्ही गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये प्रत्येकी दोन डब्यांची वाढ करण्यात येत असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची बुकिंग फुल्ल झाली असून वेटिंग लिस्ट अद्यापही शेकडोंच्या घरात आहे. त्यामुळं प्रवाशांचे आणखी हाल होऊ नये, यासाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या रेल्वेंना अधिकचे दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या रेल्वेतील डब्यांची संख्या २० हून २२ वर पोहचणार आहे.

रेल्वेचे डबे वाढवण्यात आल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाढीव आसनांचा लाभ मिळणार मिळणार आहे. अनेकांचे बुकिंग कन्फर्म झालं आहे. परंतु ज्या लोकांचे बुकिंग कन्फर्म झालेलं नाही, अशा लोकांसाठीच डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळं तिकीट तपासून पुढील नियोजनाला सुरुवात करण्याचं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

पुढील बातम्या