मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete Death : विनायक मेटेंचा अपघात की घातपात? CID करणार चौकशी

Vinayak Mete Death : विनायक मेटेंचा अपघात की घातपात? CID करणार चौकशी

Aug 17, 2022, 06:50 PM IST

    • शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार आहे. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत.
विनायक मेटेंचा अपघातकी घातपात?

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार आहे. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत.

    • शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार आहे. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत.

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार आहे. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत. विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामोठ्यातील रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे म्हटले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

विनायक मेटे यांच्या निधनानंतर अनेकांकडून प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहेत. मेटे यांचे चालक समाधान वाघमारे यांनी म्हटले की, शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल. विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी १० दिवस आधी ३ ऑगस्टला पुणे एक्स्प्रेसवर शिक्रापूरजवळ एका गाडीने त्यांचा पाठलाग केला होता. पोलिसांनी त्या कारचालकाला ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

विनायक मेटेंच्या गाडीला नेमका कशामुळे अपघात झाला, हे अजून समोर आलेले नाही. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मेटेंच्या अपघातावर काही सवाल उपस्थित केले आहे. मेटेंचा चालक समाधान वाघमारे यांनी अनेक खुलासे केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात रस्त्यावर असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यामधून बरंच काही बाहेर येईल. अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक आहेत. मात्र १४ ऑगस्टला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने ते सुट्टीवर होते व नेमके त्याच दिवशी विनायक मेटेंचा अपघात झाला व त्यांचे अकाली निधन झाले.  

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या