मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aashadhi Wari 2023 : राज्यातील वारकऱ्यांना मिळणार मोफत विमा संरक्षण, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Aashadhi Wari 2023 : राज्यातील वारकऱ्यांना मिळणार मोफत विमा संरक्षण, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Jun 21, 2023, 03:35 PM IST

    • Shinde-Fadnavis Govt : आषाढी वारी सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Shinde-Fadnavis Govt Provide Insurance Cover to Warkari Community (HT_PRINT)

Shinde-Fadnavis Govt : आषाढी वारी सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

    • Shinde-Fadnavis Govt : आषाढी वारी सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Shinde-Fadnavis Govt Provide Insurance Cover to Warkari Community : आषाढी वारी निमित्त राज्यभरातील अनेक भागातून विठूरायाच्या भक्तीसाठी वारकरी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांचं अनेक ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळं आता आषाढी वारीनिमित्त राज्यातील वातावरण भक्तिमय होत असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारने वारकऱ्यांसाठी मोठी निर्णय घेतला आहे. राज्यातील वारकऱ्यांना शासनाकडून मोफत विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळं आता या योजनेचा राज्यातील लाखो वारकऱ्यांना फायदा होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, गृह खात्याचा निर्णय

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक

Mumbai Weather Update : मुंबई, ठाण्यात पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

पंढरपुरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी शासनाकडून विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असणार आहे. वारी सुरू असताना एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच दुर्घटनेत अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येणार आहे.

वारी सुरू असताना दुर्घटनेत अंशत: अपंगत्व आल्यास पीडित वारकऱ्याला ५० हजार रुपयांची तसेच वारी दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च देण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वारी सुरू असताना अपघात किंवा दुर्घटना होत असतात. त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यामुळं अशा वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.

पुढील बातम्या