मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'कुणी गद्दार म्हटलं तर त्याच्या थोबाडीत मारा', शिंदेगटाच्या आमदाराचं वक्तव्य!

'कुणी गद्दार म्हटलं तर त्याच्या थोबाडीत मारा', शिंदेगटाच्या आमदाराचं वक्तव्य!

Jul 17, 2022, 04:06 PM IST

    • Maharashtra Politics : 'कुणी गद्दार म्हटलं तर थेट त्याच्या कानफडीत मारण्याचा' सल्ला शिंदेगटाच्या एका आमदारानं त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावर राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे.
Rebel Eknath Shinde Groups MLA Santosh Bangar (HT)

Maharashtra Politics : 'कुणी गद्दार म्हटलं तर थेट त्याच्या कानफडीत मारण्याचा' सल्ला शिंदेगटाच्या एका आमदारानं त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावर राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे.

    • Maharashtra Politics : 'कुणी गद्दार म्हटलं तर थेट त्याच्या कानफडीत मारण्याचा' सल्ला शिंदेगटाच्या एका आमदारानं त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावर राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे.

Rebel Eknath Shinde Groups MLA Santosh Bangar : एकनाथ शिंदे यांनी बंड शिवसेनेत बंड केल्यानंतर ४० आमदारांनी त्यांला पाठिंबा दिला. याशिवाय प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यासह काही अपक्ष आमदारांनी बंडात शिंदेंना साथ दिली होती. आता शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करून ते मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु आता शिवसेनेतून बंड केल्यामुळं काही आमदारांना संजय राऊतांसह शिवसेनेच्या काही नेत्यांनी गद्दार संबोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळं आता अनेक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये जात शक्तीप्रदर्शन करायला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

शिंदेंच्या बंडानंतर सुरुवातीला शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार असल्याचं सांगत नंतर भूमिका बदलून मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झालेले हिंगोलीच्या कळमनूरीचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम समर्थकांनी करावं, असा आदेशच कार्यकर्त्यांना आमदार संतोष बांगर यांना दिला आहे. एका मराठी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्यामुळं त्यांच्या या वादग्रस्त आणि हाणामारीच्या भाषेमुळं राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले आमदार संतोष बांगर?

आपल्या समर्थकांशी बोलताना आमदार बांगर म्हणाले की 'आपण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढायचं काम माझ्या शिवसैनिकांनी करायला हवं.' असं बांगर यांनी म्हटलं आहे.

संतोष बांगर हे शिवसेनेतील फायरब्रॅंड आमदार म्हणून ओळखले जायचे, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथही घेतली होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधून शिंदेगटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, याचा खुलासा खद्द शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात केला होता.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या