मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard In Pune : पुणे शहरात बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांना सावधानतेचा इशारा

Leopard In Pune : पुणे शहरात बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांना सावधानतेचा इशारा

Jul 19, 2023, 11:23 AM IST

    • Leopard In Pune : पुण्यातील वर्दळीच्या भागात नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्यामुळं आता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
Leopard Mordarwadi In Pune (HT)

Leopard In Pune : पुण्यातील वर्दळीच्या भागात नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्यामुळं आता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

    • Leopard In Pune : पुण्यातील वर्दळीच्या भागात नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्यामुळं आता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

Leopard Mordarwadi In Pune : सिंहगड परिसरात नागरिकांना बिबट्या दिल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील दक्षिण भागात असलेल्या मोरदरवाडी गावातील नागरिकांना भल्या पहाटे बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्यामुळं गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसलं असून घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर आता या परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी फिरताना काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी मोरदरवारडी परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या दक्षिण भागात असलेल्या मोरदरवाडी गावात रात्री आणि पहाटेच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसून आला. सुदैवाने यावेळी बिबट्याने कुणावरही हल्ला केला नाही. यावेळी गावातील नागरिकांनी बिबट्याचा व्हिडिओ काढला असून तो व्हिडिओ वनविभागाच्या अधिकाऱ्या पाठवण्यात आला आहे. तसेच गावात बिबट्या शिरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला आहे. त्यानंतर आता अनेक नागरिक भरदिवसा गावाबाहेर पडण्यास घाबरत आहे. त्यामुळं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सातत्याने नागरिकांना बिबट्याचं दर्शन होत आहे. यापूर्वी जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मुळशी, आंबेगाव आणि वेल्हा तालुक्यात बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर आता पावसाळा सुरू असताना बिबट्या पुणे शहरातील थेट मोरदरवाडी गावात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रामीण भागानंतर आता शहरी भागातही बिबट्या शिरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या