मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Urfi javed: उर्फी जावेद प्रकरणी महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस, रुपाली चाकणकरांची माहिती

Urfi javed: उर्फी जावेद प्रकरणी महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस, रुपाली चाकणकरांची माहिती

Jan 06, 2023, 06:52 PM IST

  • Chitra wagh vs Rupali chakankar : उर्फी जावेद प्रकरणावरून आता चित्रा वाघ व रुपाली चाकरणकर आमने-सामने आल्या आहेत. राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बाजवून याचा खुलासा दोन दिवसात करण्याचे आव्हान केले आहे.  

महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस

Chitra wagh vs Rupali chakankar : उर्फी जावेद प्रकरणावरून आता चित्रा वाघ व रुपाली चाकरणकर आमने-सामने आल्या आहेत. राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बाजवून याचा खुलासा दोन दिवसात करण्याचे आव्हान केले आहे.

  • Chitra wagh vs Rupali chakankar : उर्फी जावेद प्रकरणावरून आता चित्रा वाघ व रुपाली चाकरणकर आमने-सामने आल्या आहेत. राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बाजवून याचा खुलासा दोन दिवसात करण्याचे आव्हान केले आहे.  

Chitra wagh vs Rupali chakankar : अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदच्या (Urfi javed) तोकड्या कपड्यांवरून आता राज्यातील वातावरण आता आणखी तापू लागलं आहे.  गुरुवारी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाने चित्रा वाघ यांना याबाबत नोटीस पाठवली. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Swine Flu : नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान! एकाच दिवशी दोघांचे मृत्यू, रुग्णसंख्या २८ वर

छत्रपती संभाजीनगर : 'मम्मी मी तुला सांगू शकले नाही'.. शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून १५ वर्षीय मुलीनं संपवलं जीवन

पुण्यात पुन्हा हिट अँड रन ! १५ वर्षांच्या मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं, तरुणाचा जागीच मृत्यू

Pune karve road accident : पुण्यात कर्वे रोड येथील अपघातात एक ठार; ६६ वर्षीय वृद्ध सायकलस्वाराला क्रेननं चिरडलं

रुपाली चाकणकर म्हणाल्या की,चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार ही नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना त्याबाबत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान करण्यात आले आहे. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल असे सांगण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकरणावरकारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे. गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली,महिला आयोगाने तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ आकसापोटी,स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीला चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सूकतेचे आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या