मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivaji Maharaj : अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली शिवरायांची वाघनखं ‘या’ दिवशी मुंबईत आणणार; मुनगंटीवारांची घोषणा

Shivaji Maharaj : अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली शिवरायांची वाघनखं ‘या’ दिवशी मुंबईत आणणार; मुनगंटीवारांची घोषणा

Sep 09, 2023, 04:53 PM IST

  • Chhatrapati Shivaji maharaj wagh nakh : १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवरायांची ती वाघनखं मुंबईत आणली जाणार आहेत, तसेच ती येथील संग्रहालयात जतन करून ठेवली जातील.

Shivaji maharaj tiger claw

ChhatrapatiShivajimaharaj wagh nakh : १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवरायांची ती वाघनखंमुंबईत आणली जाणार आहेत, तसेच ती येथील संग्रहालयात जतन करून ठेवली जातील.

  • Chhatrapati Shivaji maharaj wagh nakh : १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवरायांची ती वाघनखं मुंबईत आणली जाणार आहेत, तसेच ती येथील संग्रहालयात जतन करून ठेवली जातील.

Shivaji maharaj tiger claw : स्वराज्यावर चाल करुन आलेल्या व राज्यातील अनेक मंदिरांची नासधूस केलेल्या अफझल खानाचा कोथळा शिवरायांनी ज्या वाघ नख्यांनी बाहेर काढला होता. ती जगप्रसिद्ध वाघनखं आता महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. त्याचबरोबर ही वाघनखं राज्यात परत आणण्याचा मुहूर्त ठरला आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवरायांची ती वाघ नखं मुंबईत आणली जाणार आहेत, तसेच ती येथील संग्रहालयात जतन करून ठेवली जातील. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

प्रतापगडावर शौर्य गावताना वापरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं सध्या लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ही वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे, संपूर्ण देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघ नखं हाराष्ट्रात परत आणली जाणार आहेत. ही वाघनखं सर्वांना पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही वाघ नखं ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील त्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंगही उभारण्यात येईल. सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावरही शेअर केली आहे.

 

दरम्यान शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही सध्या ब्रिटनमध्ये असून ती परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार २०२४ पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या