मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivaji Maharaj Statue : भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, उद्या लोकार्पण

Shivaji Maharaj Statue : भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, उद्या लोकार्पण

Nov 06, 2023, 09:17 PM IST

  • Chhatrapati Shivaji maharaj statue : भारत-पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji maharaj statue : भारत-पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

  • Chhatrapati Shivaji maharaj statue : भारत-पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Shivaji Maharaj Statue : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ  ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

जम्मू काश्मीर मध्ये, भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे काम पूर्ण झाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉर्डर टुरिझमची संकल्पना मांडली होती. त्या योजनेअंतर्गत छत्रपतींचा पुतळा भारत-पाक सीमेवर स्थापीत करण्यात आला आहे. भारत-पाक सीमेवर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे. 

छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण झाली. याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भारत-पाक सीमेवर स्थापित होत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाल्यानंतर हा पुतळा कुपवाडाच्या दिशेनं रवाना झाला होता. मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून 'आम्ही पुणेकर' या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून, जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या 'राष्ट्रीय रायफल्स'च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या