मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंच्या सभेसाठी बीडमधील सर्व शाळांना सुट्टी? आदेशाचा दाखला देत छगन भुजबळांची टीका

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंच्या सभेसाठी बीडमधील सर्व शाळांना सुट्टी? आदेशाचा दाखला देत छगन भुजबळांची टीका

Dec 23, 2023, 04:33 PM IST

  • Chhagan Bhujbal Vs Jarange patil : जरांगे पाटलांच्या सभेमुळे बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र शेअर करत यावर टीका केली आहे.

Chhagan Bhujbal Vs Jarange patil

Chhagan Bhujbal Vs Jarange patil : जरांगे पाटलांच्या सभेमुळे बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र शेअर करत यावर टीका केली आहे.

  • Chhagan Bhujbal Vs Jarange patil : जरांगे पाटलांच्या सभेमुळे बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र शेअर करत यावर टीका केली आहे.

बीडमध्ये शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यामुळे जरांगे आज काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सभेपूर्वी आज सकाळ बीड शहरातून रॅली काढण्यात आली. त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. या सभेच्या पार्श्वभूमीवरच आज बीडमधील जिल्हा परिषदांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश पोस्ट करून मंत्री छगन भुजबळ यांनी शाळांना सुट्टी देण्याच्या निर्णयवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

मराठा आरक्षणाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर सातत्याने टीका-टिप्पणी करत असतात. कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा, अशी मागणी करत जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तर,जरांगे यांच्या या मागणीला भुजबळांचा विरोध आहे. त्यातच मनोज जरांगे यांची शनिवारी (२३ डिसेंबर) बीडमध्ये मोठी सभा होणाार आहे. मराठा समाजाच्या वेगवेगळा संघटना या सभेची तयारी करत आहेत. दरम्यान, या सभेमुळे बीडमधील सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी देण्यात आल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचं कथित पत्र एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलं आहे.

छगन भुजबळ यांनी या पत्रासह एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय?कोणत्याही सभा, मेळावे याबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढलं होतं. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता.

आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? 

मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सुट्टीचा आदेश सोशल मीडियातून शेअर केला आहे.

पुढील बातम्या