मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cheetah: मुंबईतही येणार चित्ता, राणीच्या बागेत आणण्यासाठी असा आहे प्लॅन?

Cheetah: मुंबईतही येणार चित्ता, राणीच्या बागेत आणण्यासाठी असा आहे प्लॅन?

Sep 19, 2022, 04:53 PM IST

    • Cheetah: मुंबईतील राणीच्या बागेत २०१८ मध्ये चित्ता आणण्यासाठी योजना आखण्यात आली होती. मात्र निविदा रद्द झाल्यानं चित्ता आणण्यात अडथळा आला होता.
मुंबईतही येणार चित्ता, राणीच्या बागेत आणण्यासाठी असा आहे प्लॅन? (HT_PRINT)

Cheetah: मुंबईतील राणीच्या बागेत २०१८ मध्ये चित्ता आणण्यासाठी योजना आखण्यात आली होती. मात्र निविदा रद्द झाल्यानं चित्ता आणण्यात अडथळा आला होता.

    • Cheetah: मुंबईतील राणीच्या बागेत २०१८ मध्ये चित्ता आणण्यासाठी योजना आखण्यात आली होती. मात्र निविदा रद्द झाल्यानं चित्ता आणण्यात अडथळा आला होता.

Cheetah: तब्बल ७ दशकानंतर देशात नामशेष झालेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशात कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या नामिबियातून ८ चित्ते शनिवारी देशात आणले गेले. आता यामुळे महाराष्ट्रातही चित्ते यावेत यासाठी चर्चा सुरू झाली आहे. याआधी मुंबईत राणीच्या बागेत चित्ता आणण्यासाठी ४ वर्षांपूर्वी योजना आखण्यात आली होती. योजनेनुसार अडीच वर्षाच चित्ते येणं अपेक्षित आहे. यापूर्वी फक्त निविदा रद्द झाल्याच्या कारणामुळे चित्ते मुंबईत आणण्यात अडथळा आला होता. आता कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते आल्यानंतर मुंबईतही चित्ते आणण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

मुंबईत भायखळा इथं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) आहे. याठिकाणी चित्त्यासह पांढरा हत्ती, चिम्पाझी, लेमूर, लेझर फ्लेमिंग इत्यादी वन्यजीव आणण्यासाठी २०१८ मध्ये योजना तयार केली होती. पण यासाठी काढलेल्या निविदा तीन वेळा रद्द झाल्या होत्या. आता यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात राणीच्या बागेत वेगवेगळे वन्यजीव पाहता येतील.

राणीच्या बागेत सध्या वाघ, बिबट्या, हत्ती, कोल्हे यांच्यासह विविध वन्यजीव आणि पक्षी आहेत. यामध्ये आणखी नवे प्राणी आणण्यासाठी पालिकेकडून तीन वेळा निविदा काढली गेली होती. मात्र काही कारणांनी निविदा रद्द केल्या होत्या. आता पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू केली जाईल. भारतात चित्ता आल्यानंतर आता मुंबईतही चित्ता यावा यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी होत आहे. राणीच्या बागेत चित्ता येण्यासाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागेल. तसंच पांढरा सिंहसुद्धा बागेत पाहता येईल. पण त्यासाठी आणखी काही काळ लागेल असं म्हटलं जात आहे.

सध्या राणीच्या बागेत दोन वाघ आहेत. औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयातून शक्ती आणि करिष्मा ही वाघांची जोडी आणण्यात आली होती. १३ वर्षांच्या कालावधीनंतर राणी बागेत वाघ दिसले होते. या वाघांच्या जोडीला गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०२१ मध्ये एक बछडासुद्धा झाला. त्याचं नाव वीरा असं ठेवण्यात आलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या