मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे, मी मध्यस्थी करण्यास तयार”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

“उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे, मी मध्यस्थी करण्यास तयार”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Apr 04, 2023, 11:44 PM IST

  • Chandrakant patil : हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईन, असं विधान पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Chandrakant patil : हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुखउद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईन, असं विधानपाटील यांनी केलं आहे.

  • Chandrakant patil : हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईन, असं विधान पाटील यांनी केलं आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणले अन् राज्याच्या सत्तेचा संपूर्ण सारीपाटच बदलून टाकला.मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेले वाद-विवाद व आरोप-प्रत्यारोपांचा फैरी असूनही सुरूच आहेत. उद्धव ठाकरेंकडून शिंदे व भाजपवर टीकेची झोड उठवून घायाळ केले असताना भाजप व शिंदे गटाकडूनही तिखट प्रतिहल्ला केला जात आहे. मात्र अशा परिस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. मला वरिष्ठांकडून आदेश आल्यास मी या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन, असं विधान पाटील यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटील म्हणाले की, सध्या कोर्टाच्या निकालाबाबतं बोलणं योग्य नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार असून, ठाकरे गटात जे उरले आहे तेही इकडे येतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एकीकडे आज राज्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा वाद विकोपाला गेला असताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरनिशाणा म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभं राहून एकदा विचार करायला हवा होता. त्यांनी ठाकरे कुटुंब म्हणून परिणामांचा विचार करायला हवा होता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

पुढील बातम्या