मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahaparinirvan Diwas: महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या १४ विशेष गाड्या धावणार

Mahaparinirvan Diwas: महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या १४ विशेष गाड्या धावणार

Nov 25, 2023, 10:19 PM IST

  • Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

Central railway will run 14 special trains for Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas

Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

  • Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून लाखो लोक येत असतात. या दिवशी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर २०२३ रोजी आहे. या दिवसासाठी नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईदरम्यान ३ विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूरदरम्यान ६ विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. कर्नाटकातील कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान दोन विशेष चालवण्यात येतील. सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान दोन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. तसेच नागपुरातील अजनी स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान १ विशेष ट्रेन चालविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे

(अ) नागपूर- मुंबई अनारक्षित विशेष (३)

१. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२६२) नागपूर येथून ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.

२. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२६४) दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.

३. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२६६) दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल.

या रेल्वे गाडीचे थांबे: नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

गाडीची संरचना:

विशेष ट्रेन क्रमांक ०१२६२ - १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

विशेष ट्रेन क्रमांक ०१२६४ आणि ०१२६६ - १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

(ब) मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (६)

१. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२४९) दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता नागपूर येथील अजनी स्टेशन येथे पोहोचेल.

२. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२५१) दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ६.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

३. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२५३० दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी (६ व ७ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री) दादर, मुंबई येथून मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल.

४. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२५५) दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.

५. विशेष गाडी (क्रमांक ०१२५७) दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ६.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता पोहोचेल.

६. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२५९) दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी (७ व ८ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून मध्यरात्री १२.४० सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल.

या गाडीचे थांबे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर.

संरचना:

विशेष ट्रेन क्रमांक ०१२४९, ०१२५५, ०१२५७ आणि ०१२५९ या विशेष ट्रेनला १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

विशेष ट्रेन क्रमांक ०१२५१ आणि ०१२५३ - १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

(क) कलबुर्गी ते मुंबई अनारक्षित विशेष (२)

१. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२४५) कर्नाटकातील कलबुर्गी येथून दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.

२. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२४६) दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी (६ व ७ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री) १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.

या गाडीचे थांबे: कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: ८ सामान्य द्वितीय श्रेणी

(ड) सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष (२)

१. विशेष ट्रेन क्रमांक ०१२४७

हा ट्रेन दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.२० वाजता पोहोचेल.

२. विशेष ट्रेन (क्रमांक ०१२४८) दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी (६ व ७डिसेंबरच्या मध्यरात्री) १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी सकाळी ०९.०० वाजता पोहोचेल.

या गाडीचे थांबे: सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: ९ सामान्य द्वितीय श्रेणी.

(इ) अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष (१)

१. सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक ०२०४० अजनी येथून दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ४.१० वाजता पोहोचेल.

या गाडीचे थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी.

मध्य रेल्वेने दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी सुरू होणार्‍या ट्रेन क्रमांक ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -आदिलाबाद एक्स्प्रेसचा प्रवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या फायद्यासाठी १ सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढील बातम्या