मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Heavy Rain : अकोल्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून; मोठा अपघात टळला, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

Heavy Rain : अकोल्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून; मोठा अपघात टळला, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

Jul 11, 2023, 12:20 AM IST

  • heavy rain in Vidarbha : अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील ट्रॅकखालची गिट्टी वाहून गेली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अकोल्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून

heavyrain in Vidarbha : अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील ट्रॅकखालची गिट्टी वाहून गेली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  • heavy rain in Vidarbha : अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील ट्रॅकखालची गिट्टी वाहून गेली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर वाढला असूनवादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील माना परिसरातील मंडुरा रेल्वे स्थानक नजीकच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी घुसल्याने रेल्वे ट्रॅक खालील भराव वाहून गेला आहे. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी प्रसंगावधान राखत रेल्वे थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वेगवेगळ्या रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक ३५३४ जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. हे पाणी रुळाखालून वाहून जाताना रुळाखालील गिट्टी देखील वाहून गेल्याने रुळाचा काही भाग हा अधांतरी झाला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरण्यात आली. मूर्तिजापूर, बडनेरासह इतर रेल्वेस्थानकावर गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. हे दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत हे कार्य सुरू होते.

रुळाखालील भराव वाहून गेल्याने हावडा-मुंबई या प्रमुख लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अमरावती-मुंबई, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल तसेच इतर गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली आहे.

पुढील बातम्या