मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Central Railway News : फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल! मुंबईत एका वर्षात केली १०० कोटींची दंडवसुली

Central Railway News : फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल! मुंबईत एका वर्षात केली १०० कोटींची दंडवसुली

Feb 15, 2024, 07:24 PM IST

  • central railway collected 100 crore fine : सेंट्रल रेल्वेने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

central railway collected 100 crore fine

central railway collected 100 crore fine : सेंट्रल रेल्वेने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

  • central railway collected 100 crore fine : सेंट्रल रेल्वेने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

central railway collected 100 crore fine : रेल्वेहे प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. रोज लाखो नागरिक रेल्वेतून प्रवास करत असतात. मुंबईत लोकल आणि इतर रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सोबत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. अशा फुकट्या प्रवाशांवर रेल्वेने कारवाईचा दंडुका उपसला आहे. रेल्वेने विशेष रेल्वे तिकीट तपासणी मोहीम राबवत असून गेल्या वर्ष भरात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तब्बल १०० कोटींची दंडवसुली केली आहे. गेल्या वर्षी देखील २६ फेब्रुवारीपर्यंत १०० कोटींची दंड वसूली करण्यात आली होती. मात्र, या वर्षी १३ फेब्रुवारीलाच दंडवसूलीचा हा आकडा रेल्वेने पार केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाचा केंद्राला झटका; गुप्त देणगीची ‘इलेक्टोरल बॉण्ड’ योजना केली रद्द

रेल्वेचा विस्तार मोठा आहे. मुंबईत कोणत्याही भागात जाण्यासाठी लोकलहा बेस्ट पर्याय आहे. लोकलही मुंबईची लाईफलाइन आहे. दरम्यान, हा प्रवास करतांना ‘रेल्वेचे तिकीट काढून, सन्मानाने प्रवास करा’ असे आवाहन रेल्वेने केले आहे. तसे घोषवाक्य तयार करून प्रवाशांमध्ये जागृती देखील केली जात आहे. मात्र, असे असले तरी रोज हजारो प्रवाशी फुकट रेल्वे प्रवास करत असल्याने रेल्वेला याचा फटका बसत आहे. यामुळे अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात येते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने या आर्थिक चालू वर्षात विशेष मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत रोज हजारो प्रवाशी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी नियमित तिकीट तपासणीत आणि तेजस्विनी पथक व इतर तिकीट तपासणी पथकाने तब्बल १२.७४ लाखांहून अधिक विनातिकीट प्रवासी पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

Tadoba : ताडोबा जंगलात वाघोबाची स्वच्छता मोहीम! पाणवठ्यातील प्लॅस्टिक बॉटल काढतांचा व्हिडिओ व्हायरल

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०२४ मध्ये कोकण रेल्वेवरील विनातिकीट नसलेल्या आणि अनियमित तिकीट असलेल्या ९,५४८ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २,१७,९७,१०२ रुपयांचा दंड वसूल केला गेला. मध्य रेल्वेने मंगळवारी पाच रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करून ८५ विनातिकीट प्रवाशांना पकडून ३३,३४० रुपयांचा दंडवसुल केला.

रेल्वेमधील फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वेने खास पथळ स्थानप केले आहे. हे पथक रेल्वेगाड्यांमध्ये, स्थानकांमध्ये थांबून प्रवाशांची तिकीट तपासणी करते. या तपासणी पथकाने वर्षभरात मध्यरेल्वेला १०० कोटी रुपयांची वसूली करून देत मालामाल केले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या