मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना दणका! जीएसटी विभागाने केली वैद्यनाथ साखर कारखान्याची १९ कोटींची मालमत्ता जप्त

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना दणका! जीएसटी विभागाने केली वैद्यनाथ साखर कारखान्याची १९ कोटींची मालमत्ता जप्त

Sep 25, 2023, 09:06 AM IST

    • Vaidyanth Sakhar Kharkhana : भाजपच्या धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Vaidyanth Sakhar Kharkhana

Vaidyanth Sakhar Kharkhana : भाजपच्या धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

    • Vaidyanth Sakhar Kharkhana : भाजपच्या धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाने मोठा दणका दिला आहे. त्यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करत कारखान्याची तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या पूर्वी देखील या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतरची करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Pune Ganesh festival: भक्ताचा दगदुशेठ गणपतीला अनोखा उपहार; तब्बल ३०१ किलोचा मोदक व १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. पक्षात होणारी घुसमट तसेच त्यानंतर त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने या कारखान्या भोवती फास आवळला आहे. या पूर्वी देखील या कारखान्यावर एप्रिल महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Pune accident : पुण्यात भीषण अपघात! कामाच्या शोधात मध्यप्रदेशातून आलेल्या पाच मजुरांना भरधाव कारने चिरडले, तिघे ठार

मिळालेल्या माहितीनुसार वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटी रुपयांचा सरकारचा जीएसटी कर बुडवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कारखान्याची चौकशी सुरू होती. या पूर्वी एप्रिल महिन्यात कारखान्यावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी कारखान्याला नोटिस बजावली होती. दरम्यान, कारखान्याची जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एक पत्रक कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जीएसटी विभागाने लावले आहे. येथील बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जीएसटी विभागाने जप्त केले आहे. दरम्यान, या यंत्रांचा लिलाव करून १९ कोटी रक्कम वसूल केली जाणार आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीत हा कारखाना उभा केला होता. सर्वाधिक गाळप करणारा कारखाना म्हणून याची ओळख होती. मात्र, आता हा कारखाना आर्थिक डबघाईला आला आहे. कोरोना काळात या कारखान्यात तयार झालेली साखर ही थेट व्यापाऱ्याला विकण्यात आली होती. मात्र या व्यवहाराची जीएसटीची रक्कम केंद्र सरकारकला भरण्यात आली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या