मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abdul Sattar: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा; निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती

Abdul Sattar: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा; निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती

Jul 13, 2023, 08:08 AM IST

    • Filed Case Against Abdul Sattar: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Abdul Sattar (HT)

Filed Case Against Abdul Sattar: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

    • Filed Case Against Abdul Sattar: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मुंबई: निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिल्याने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आता चंगलीच वाढ होणार आहे. कृषी मंत्री सत्तार हे त्याच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असतात.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune Superstition News : घरात सुख शांतीसाठी पूजेचा घाट; पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने गमावले तब्बल २८ लाख

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणाची दाखल घेत तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, तपासात सत्तार यांनी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सील्लोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Delhi flood: दिल्लीत यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; सखल भागात पाणी साचल्याने नागरिक बेघर; पाहा फोटो

सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ ची निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या संपत्ती विषयक प्रतिज्ञा पत्रात वेगवेगळी माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, तपासात मालमत्तेत तफावत आढळली असल्याचे न्यायालयाने मान्य करत त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले.

 

तर जाणार आमदारकी

सत्तार यांच्यावर जर हे आरोप सिद्ध झाले तर त्यांची आमदारकी धोक्यात येणार आहे. असे झाल्यास आमदारकी तर रद्द होईलच या सोबतच त्यांना पुढील सह वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. असे झाल्यास सत्तार यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.

महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सत्तार यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, तपास समाधान कारण ंन झाल्याने ते दोन वेळा न्यायालयात गेले होते. यकेर तिसऱ्यांदा न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ११ जुलैला न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध पुरावे तपासत फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या