मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Meeting : ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे करणार, मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय

Cabinet Meeting : ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे करणार, मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय

Feb 14, 2024, 04:25 PM IST

  • Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये १० महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Cabinet Meeting Decision

Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये १० महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये १० महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार)  राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते बांधणी, वाळू दर निश्चिती, इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्वी शिष्यवृत्ती असे निर्णय घेण्यात आले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे –

  1. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे.
  2. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार.
  3. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये.
  4. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
  5. उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा.
  6. सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास.
  7. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना.
  8. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय.
  9. औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. ५० टक्के मुद्रांक शुल्क सवलत.
  10. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या