मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा; TV, एसीसह लाखोंचा माल लंपास

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा; TV, एसीसह लाखोंचा माल लंपास

Mar 20, 2023, 09:53 AM IST

  • Gunaratna Sadavarte Thane Office Theft : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात चोरट्यांनी सीसीटीव्हीचे वायर तोडत कार्यालयातील एसी आणि टीव्हीसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.

Gunratna Sadavarte

Gunaratna Sadavarte Thane Office Theft : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात चोरट्यांनी सीसीटीव्हीचे वायर तोडत कार्यालयातील एसी आणि टीव्हीसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.

  • Gunaratna Sadavarte Thane Office Theft : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात चोरट्यांनी सीसीटीव्हीचे वायर तोडत कार्यालयातील एसी आणि टीव्हीसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.

ठाणे : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात चोरट्यांनी दरोडा टाकत कार्यालयातील सीसीटीव्हीचे वायर कापून एसी आणि टीव्हीसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडक्यांचे गज कापले. तसेच त्यातून आत शिरले. ही घटना रविवारी रात्री घडली. दारमहान, ही चोरी डायमंड गँगने केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वागळे इस्टेट येथील इमारतीत, गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय बंद होते. रविवारी रात्री, चोरट्यांनी या कार्यालयाचे गज कापले आणि येथील सरकत्या खिडक्या तोडून कार्यालयात प्रवेश केला. यानंतर कार्यालयातील सीसीटीव्हीची वायर तोडत त्यांनी कार्यालयातील एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आदींसह इतर वस्तू असा अंदाजे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही चोरी डायमंड गँग नावाच्या एका टोळीने केल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे असून ही टोळी कोविड काळनंतर बंद पडलेल्या कार्यालयांना लक्ष्य करते आणि त्यातील माल चोरुन भंगारमध्ये विकते. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून ही चोरी डायमंड गँगने केली असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या