मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC News : महापालिका अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

BMC News : महापालिका अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

Jun 27, 2023, 11:23 AM IST

  • MLA Anil Parab : मुंबईत काही भागात दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. यावर मुंबई महापालिका कुठलीच कारवाई करत नसल्याने सोमवारी, शिवसेनेच्या ठाकरे गटाने आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली जण आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याने मोठा राडा झाला होता.

BMC News

MLA Anil Parab : मुंबईत काही भागात दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. यावर मुंबई महापालिका कुठलीच कारवाई करत नसल्याने सोमवारी, शिवसेनेच्या ठाकरे गटाने आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली जण आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याने मोठा राडा झाला होता.

  • MLA Anil Parab : मुंबईत काही भागात दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. यावर मुंबई महापालिका कुठलीच कारवाई करत नसल्याने सोमवारी, शिवसेनेच्या ठाकरे गटाने आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली जण आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याने मोठा राडा झाला होता.

मुंबई : मुंबईत होणाऱ्या दूषित पाण्याचा परूवठ्यासंदर्भात कुठलीच कारवाई महापालिकेतर्फे होत नसल्याने शनिवारी शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जन आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी अनिल परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. दरम्यान, अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार अनिल परब यांच्यासह १५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर चौघांना अटक करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

दूषित पाणीप्रश्नी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सोमवारी महानगर पालिकेवर मोर्चा काढला होता. दरम्यान, वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करत ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत ही शाखा पाडली होती. याचा राग देखील कार्यकर्त्यांच्या डोक्यात होता. हा राग अनावर झाल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. या संदर्भात काल पर्यंत कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती अशी माहिती वाकोला पोलिसांनी दिली होती. मात्र, या प्रकरणी रात्री उशिरा आमदार अनिल परब यांच्यासह १५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे कार्यकर्ते थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चालून गेले. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. पोलिसांनी देखील याला दुजोरा दिला आहे. आमदार अनिल परब यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करत त्यांना जबर मारहाण केली. काल ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली होती, त्या अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांनी वाकोला पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. त्यानंतर आमदार अनिल परब यांच्यासह त्यांच्या १५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या