मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Election: शेवटची निवडणूक असल्यासारखे लढा : देवेंद्र फडणवीस

BMC Election: शेवटची निवडणूक असल्यासारखे लढा : देवेंद्र फडणवीस

Sep 05, 2022, 02:56 PM IST

    • Devendra Fadnavis On BMC Election: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Rahul Singh)

Devendra Fadnavis On BMC Election: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

    • Devendra Fadnavis On BMC Election: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Devendra Fadnavis On BMC Election: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपचाच महापौर पाहिजे असं आवाहन केलं. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दंड थोपटले आहेत. महापालिकेवर आपलाच महापौर बसवायचा यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "देशाला माहिती आहे की चाणक्य कोण आहे? आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अशी लढा की ही शेवटचीच निवडणूक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसला पाहिजे." देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी भाजपचे बडे नेते आणि मंत्रीही उपस्थित होते. गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर या नेत्यांनीही बैठकीला हजेरी लावली होती.

मुंबई महापालिकेत भाजपचे किती जागांचे टार्गेट असणार याची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचे १३५ जागा निवडून आणण्याचे टार्गेट असणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीकास्र सोडले. भाजपच्या जागा पाडून शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप यावेळी अमित शहांनी केला. तसंच मुंबईत भाजप १५० जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी धोका दिल्याचं म्हटलं, त्यांना योग्य शिक्षा होणार असा इशारा अमित शहा यांनी दिला.

पुढील बातम्या