मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी होणार सादर, मुंबईकरांना काय मिळणार?

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी होणार सादर, मुंबईकरांना काय मिळणार?

Feb 02, 2023, 09:01 PM IST

  • Mumbai municipal corporation budget 2023-24 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येत्या शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

BMC Budget

Mumbai municipal corporation budget 2023-24 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येत्या शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

  • Mumbai municipal corporation budget 2023-24 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येत्या शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

BMC Budget 2023-24 : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व दिल्ली व गोवा राज्याच्या अर्थसंकल्पाहून मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी ( ४ फेब्रुवारी) सादर होणार आहे.  मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा बजेट प्रशासकाकडून सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर सवलतींची खैरात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सादर होणार असल्याने आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी भरीव तरतुदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांना काय मिळणार हे ४ फेब्रुवारी रोजीच स्पष्ट होणार आहे. 

मुंबईचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. शनिवारी सादर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्था सशक्तीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणूक वर्षातील अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचे प्रशासक व आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडणार  आहेत तसेच तेच अर्थसंकल्पाला मंजुरी देणार आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकच अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या