मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Cut : मुंबई शहरात आजपासून ५ टक्के पाणीकपात; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Mumbai Water Cut : मुंबई शहरात आजपासून ५ टक्के पाणीकपात; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Mar 15, 2024, 09:05 AM IST

  • Mumbai Water Supply: आशिया खंडातील सर्वात मोठ्या भांडुप प्रकल्पाची पाहणी आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने आजपासून मुंबईत पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे.

Mumbai water Problem

Mumbai Water Supply: आशिया खंडातील सर्वात मोठ्या भांडुप प्रकल्पाची पाहणी आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने आजपासून मुंबईत पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे.

  • Mumbai Water Supply: आशिया खंडातील सर्वात मोठ्या भांडुप प्रकल्पाची पाहणी आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने आजपासून मुंबईत पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे.

Mumbai Water Cut: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आजपासून येत्या २४ एप्रिलपर्यंत शहरात पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. महापालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या तपासणी व स्वच्छतेच्या कामांमुळे ही उपाययोजना करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशियाखंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल येथे एक हजार ९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट आहे. पालिकेतर्फे मान्सूनपूर्व साफसफाई व तपासणी प्रक्रिया राबविली जाते.

तलावांची पातळी खालावल्याने महापालिकेने १ मार्च रोजी मुंबईत १० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, राखीव साठ्यातून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. पाईपलाईनच्या शेवटी किंवा उंच उतारावर असलेल्या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू शकते. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या