मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'पत्रकारांना ढाब्यावर बोलवा…’ भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध

'पत्रकारांना ढाब्यावर बोलवा…’ भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध

Sep 25, 2023, 08:24 PM IST

  • BJP president's remark on journalist - ‘भाजपविरोधात बातम्या छापून येता कामा नये. भाजपविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ढाब्यावर बोलवून चहा पाजा’, असा संवाद असलेली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिक सध्या राज्यभरात व्हायरल होत आहे.

Bharatiya Janata Party (BJP) state unit president Chandrashekhar Bawankule (HT FILE PHOTO) (HT_PRINT)

BJP president's remark on journalist - ‘भाजपविरोधात बातम्या छापून येता कामा नये. भाजपविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ढाब्यावर बोलवून चहा पाजा’, असा संवाद असलेली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिक सध्या राज्यभरात व्हायरल होत आहे.

  • BJP president's remark on journalist - ‘भाजपविरोधात बातम्या छापून येता कामा नये. भाजपविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ढाब्यावर बोलवून चहा पाजा’, असा संवाद असलेली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिक सध्या राज्यभरात व्हायरल होत आहे.

‘भाजपविरोधात बातम्या छापून येता कामा नये. भाजपविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ढाब्यावर बोलवून चहा पाजा’, असा संवाद असलेली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिक सध्या राज्यभरात व्हायरल होत आहे. बावनकुळे यांनी काल अहमदनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या एका संमेलनात बोलताना वरील उदगार काढले होते. दरम्यान, बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. राज्यभरातील विविध पत्रकार संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्या या दमदाटीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

बावनकुळेंवर कॉंग्रेसची सडकून टीका

२०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप भाजपाने केले आहे. पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे व चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांचा अवमान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निषेध करून त्यांनी राज्यातील पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली.

भाजपला पत्रकारांना निर्भिडपणे काम करू द्यायचं नाहीः सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केला.विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

कोल्हापूर प्रेस क्लबकडून अनोख्या पद्धतीने निषेध

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा कोल्हापूर प्रेस क्लबकडून निषेध करण्यात आला. यावेळी कोल्हापुरातील पत्रकारांनी काळा चहा पिऊन निषेध व्यक्त केला. तर निषेध म्हणून प्रेस क्लबच्या आवारात कोल्हापुरी चप्पल ठेवण्यात आली होती.

पुढील बातम्या