मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; ४८ मुस्लिम नेते सांभाळणार प्रचाराची जबाबदारी

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; ४८ मुस्लिम नेते सांभाळणार प्रचाराची जबाबदारी

Sep 14, 2023, 09:59 AM IST

    • Chandrashekhar Bawankule on Loksabha Election: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. 
Chandrashekhar Bawankule on Loksabha Election (HT)

Chandrashekhar Bawankule on Loksabha Election: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.

    • Chandrashekhar Bawankule on Loksabha Election: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. 

पुणे : महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रात ४८ मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार आहे. हे नेते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचवतील. तसेच लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देखील या नेत्यांवर राहणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Mumbai toll hike: मुंबईत प्रवेश महागला! चारचाकीसाठी आता मोजावे लागणार तब्बल एवढे पैसे

चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्यात आले असतांना एका कार्यक्रमात मध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी वरील माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, मुस्लिम समाजात पंतप्रधान मोदींबद्दल आत्मियता आहे. महायुतीचे सरकार खेळीमेळी व समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेत आहेत. सरकारमधील सर्वांसाठी सत्ता ही गौण तर राष्ट्रहित महत्वाचे आहे.

Mumbai Crime: प्रियकरानं केला गर्लफ्रेंडचा बादलीत बुडवून खून; बायकोच्या मदतीने सुटकेसमध्ये मृतदेह भरून लावली विल्हेवाट

विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहेत. यावर बावनकुळे म्हणाले, राहुल नार्वेकर हे उत्कृष्ठ वकील आहे. ते मेरीटचे विद्यार्थी असून ते मेरीटवरच निकाल देतील. ते कोणतिही गटबाजी किवा कुणावरही अन्याय होणार नाही, असा निकाल देतील.

मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय झाला. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा यासह पूर्ण सरकारच तेथे गेले आहे.

उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी स्टॅलीनचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे महाराष्ट्राला सांगावे, मान्य नसेल तर इंडिया आघाडी सोडणार का? असा सवाल देखील बावनकुळे यांनी केला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या