मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म; सुजय विखे पाटलांची टीका

शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म; सुजय विखे पाटलांची टीका

May 26, 2022, 12:47 PM IST

    • सुजय विखे पाटील यांनी म्हटलं की, गेल्या ३ वर्षात शिवसेना फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे.
भाजप खासदार सुजय विखे पाटील

सुजय विखे पाटील यांनी म्हटलं की, गेल्या ३ वर्षात शिवसेना फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे.

    • सुजय विखे पाटील यांनी म्हटलं की, गेल्या ३ वर्षात शिवसेना फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. त्यातच आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचा जन्म हा महाविकास आघाडीत शिवसेनेला संपवण्यासाठी झाला असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा कार्यकाळ संपणार असून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली. यावरून सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. संभाजी राजेंच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरु असताना या विषयाची सुरुवात कोणी केली? याला ठिणगी कोणी लावली आणि आज या आगीत कोण जळतंय हे सर्व महाविकास आघाडीचं चित्र जनता पाहत आहे असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.

शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची उमेदवारी देऊ अशी ऑफर दिली होती. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावत आपण अपक्षच लढणार असं सांगितलं. त्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली.

सुजय विखे पाटील यांनी म्हटलं की, गेल्या ३ वर्षात शिवसेना फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीआधीच त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्याआधी हा विषयसुद्धा चर्चेत नव्हता. मात्र पाठिंब्याची घोषणा करून हा विषय चर्चेत आणला आणि तो शिवसेनेकडे वळवला असाही दावा सुजय विखे पाटील यांनी केला.

आज जिथून चर्चेला सुरुवात झाली, ज्यांनी हा विषय मांडला त्यांच्यावर कोणताच आरोप नाही. सर्व दोष हा शिवसेनेला दिला जातोय. राज्याच्या निधीतलं ७६ टक्के बजेट राष्ट्रवादी घेतेय. शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी त्यांना निधी नाही. त्यांना फक्त टीकेचा आणि त्रासाचा धनी केलं जातंय. तरीही शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाही ही शोकांतिका आहे असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या