मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinod Tawde : नाथाभाऊ, राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपात या, विनोद तावडेंची खडसेंना भावनिक साद

Vinod Tawde : नाथाभाऊ, राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपात या, विनोद तावडेंची खडसेंना भावनिक साद

Jun 05, 2023, 11:08 AM IST

  • Vinod Tawde News : एकनाथ खडसेंना भाजपात येण्याचं आमंत्रण देत तावडेंनी पक्षातील जून्या नेत्यांची फळी पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले आहे.

Vinod Tawade On Eknath Khadse (HT)

Vinod Tawde News : एकनाथ खडसेंना भाजपात येण्याचं आमंत्रण देत तावडेंनी पक्षातील जून्या नेत्यांची फळी पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले आहे.

  • Vinod Tawde News : एकनाथ खडसेंना भाजपात येण्याचं आमंत्रण देत तावडेंनी पक्षातील जून्या नेत्यांची फळी पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले आहे.

Vinod Tawde On Eknath Khadse : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे चांगलेच सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता विनोद तावडे यांनी एकेकाळचे भाजपातील सहकारी आणि सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळं आता भाजपात काहीही आलेबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. याशिवाय तावडेंच्या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच विनोद तावडे यांनी राज्याच्या राजकारणात परतण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपात प्रवेश करण्याचं निमंत्रण दिल्यामुळं भाजपात सुप्त संघर्ष रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाची चांगलीच जाण आहे. त्यांच्यासारखा नेता भाजपात असायला हवा. याबाबत मी पक्षाच्या शीर्ष नेत्यांना प्रस्ताव दिलेला नाही, तसेच कोणतीही चर्चाही झालेली नाही. परंतु एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात प्रवेश करण्याबद्दल विचार करायला हवा, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खटके उडाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून खडसे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं होतं.

पुण्यातील भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच प्रकरणात खडसे यांचे जावई गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. याशिवाय एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यातच आता विनोद तावडे यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपात येण्याची ऑफर दिल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पुढील बातम्या