मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : कोणताही समाज वेदना सहन करणार नाही; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निशाणा कुणावर?

Pankaja Munde : कोणताही समाज वेदना सहन करणार नाही; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निशाणा कुणावर?

Oct 24, 2023, 03:36 PM IST

    • pankaja munde live : ज्या-ज्या वेळी अडचणीत आले, त्यावेळी लोकांनी मला निस्वार्थ पाठिंबा दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी सतत लढत राहणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
pankaja munde dasara meleva savargaon (HT)

pankaja munde live : ज्या-ज्या वेळी अडचणीत आले, त्यावेळी लोकांनी मला निस्वार्थ पाठिंबा दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी सतत लढत राहणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

    • pankaja munde live : ज्या-ज्या वेळी अडचणीत आले, त्यावेळी लोकांनी मला निस्वार्थ पाठिंबा दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी सतत लढत राहणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

pankaja munde dasara meleva savargaon : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या मारहाणीनंतर राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिणामी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढल्या आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातील सावरगावातल्या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर रोकठोक भूमिका मांडली आहे. सातत्याने अपेक्षाभंग होत असल्याने कोणताही समाज वेदना सहन करू शकणार नाही, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं आता दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख न करता जोरदार टोलेबाजी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

सावरगावातील दसरा मेळाव्यात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर झालेले आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि उस तोड कामगारांना न्याय मिळत नाही. अशातच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. अपेक्षाभंग झाला की कोणताही समाज फार काळ वेदना सहन करू शकत नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. याशिवाय राज्यातील ओबीसी समाज देखील सरकारकडे आशेने पाहत असल्याचं सांगत शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा दिला आहे.

पंकजा मुंडेंची भाषणातून शेरोशायरी-

दसरा मेळाव्यात भाषण सुरू केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हिंदीतून जोरदार शेरोशायरी केल्याचं पाहायला मिळालं. 'न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला.. इम्तेहान सख्त लेता है मगर हारने नहीं देता है', असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपमधून सातत्याने डावललं जात असल्याच्या मुद्द्यावर टिप्पणी केली आहे. निवडणूक हरलेली असली तरी लोकांच्या नजरेतून मी पडलेली नाही. दसरा मेळाव्याला कोणत्याही एका जातीचे लोक आलेले नाहीत. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि उसतोड करणारे लोक आज सुखात नाहीत. त्यामुळं त्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुढील बातम्या