मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirit Somaiya Video : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांची धावाधाव, फडणवीसांना लिहिलं पत्र

Kirit Somaiya Video : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांची धावाधाव, फडणवीसांना लिहिलं पत्र

Jul 18, 2023, 09:32 AM IST

    • Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Kirit Somaiya Viral Video News (HT)

Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    • Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Kirit Somaiya Viral Video News : भाजपाचे दिग्गज नेते आणि सातत्याने विरोधकांवर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या हाती किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ लागला असून त्यावरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांचा तो अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता 'मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचं' सांगत किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटलं की, सोमवारी सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लीप प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यानंतर मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे, परंतु मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळं आपण या व्हायरल व्हिडिओची आणि आरोप करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.

सोमय्यांवर दानवेंचे गंभीर आरोप...

भाजपा नेते किरीट सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनी दाखवत आहे. माझ्याकडे सोमय्या यांच्याविरोधात अनेक महिलांनी तक्रार केल्याची माहिती आहे. परंतु माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे, त्यामुळं सोमय्यांचा विषय योग्य व्यासपीठावर मांडणार असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपला धारेवर धरलं आहे.

पुढील बातम्या