मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nirmala Sitharaman : फोटोचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यावर भडकल्या निर्मला सीतारामन; व्हिडिओ झाला व्हायरल

Nirmala Sitharaman : फोटोचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यावर भडकल्या निर्मला सीतारामन; व्हिडिओ झाला व्हायरल

Sep 23, 2022, 11:53 AM IST

    • Nirmala Sitharaman Baramati tour : बारामती मतदार संघात दौऱ्यावर असणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल सासवड दौऱ्यावर असताना फोटो काढण्याची मागणी करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर चांगल्याच भडकल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्या कार्यकर्त्याला समज देतांना दिसत आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Baramati tour : बारामती मतदार संघात दौऱ्यावर असणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल सासवड दौऱ्यावर असताना फोटो काढण्याची मागणी करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर चांगल्याच भडकल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्या कार्यकर्त्याला समज देतांना दिसत आहेत.

    • Nirmala Sitharaman Baramati tour : बारामती मतदार संघात दौऱ्यावर असणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल सासवड दौऱ्यावर असताना फोटो काढण्याची मागणी करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर चांगल्याच भडकल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्या कार्यकर्त्याला समज देतांना दिसत आहेत.

पुणे : भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यंची फौज कामाला लागली आहे. या मतदार संघाची जबाबदारी ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिली आहे. त्या सध्या बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सासवड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती घेतली. तसेच बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. ही बैठक झाल्यावर त्या परत जात असतांना एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे फोटोचा आग्रह धरला. यामुळे सीतारामन या त्याच्यावर भडकल्या. त्यांनी त्या कार्यकर्त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सासवड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी बूथ कमिटीच्या अध्यक्षांची बैठक घेतली. त्यांनी केंद्राच्या योजना जास्तीत जास्त नगरिकांपर्यंत पोहचवा अशा सूचना त्यांनी दिल्या येथील भेट झाल्यावर त्या निघाल्या असताना एक कार्यकर्ता हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आला होता.

 

यावेळी त्याने मी सुरवातीपासून भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगत कुटुंबासोबत फोटो काढण्याची विनंती केली. एव्हढेच नाही तर 'मॅडम आमचं पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबलो आहे असे देखील या कार्यकर्त्याने सीतारामन यांना सांगितले, मात्र, या कार्यकर्त्याचा आग्रह निर्मला सीतारामन यांना आवडला नाही. त्यांनी या कार्यकर्त्याला थेट झापले. त्याला समज देत त्या गाडीत बसून पुढच्या प्रवासाला निघून गेल्या. माझ्या वडिलांपासून आम्ही भाजपचे काम करतो. यामुळे एक आठवण म्हणून मी फोटोचा आग्रह धरल्याचे या कार्यकर्त्याने प्रसार माध्यमांना सांगितले.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या