मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “अजित पवारांची दया येते, कारण त्यांना कितीही वेळा..”, भगतसिंह कोश्यारींचं विधान, शरद पवारांवरही टिप्पणी

“अजित पवारांची दया येते, कारण त्यांना कितीही वेळा..”, भगतसिंह कोश्यारींचं विधान, शरद पवारांवरही टिप्पणी

Aug 26, 2023, 09:00 PM IST

  • bhagatsingh koshyari on Ajit Pawar : अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असं मिश्किल टिप्पणी भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

bhagatsingh koshyari on Ajit Pawar

bhagatsingh koshyari on Ajit Pawar : अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा,ते तयार असतात,असं मिश्किल टिप्पणी भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

  • bhagatsingh koshyari on Ajit Pawar : अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असं मिश्किल टिप्पणी भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे सरकारला आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे जेरीस आणणाऱ्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी प्रकरणामुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत आले होते. याबाबत एका मुलाखतीत विचारल्यानंतर कोश्यारी यांनी अजित पवारांचं कौतुक केले आहे. अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात,असं मिश्किल टिप्पणी भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले यांनी फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. कोश्यारी म्हणाले की, अजित पवार स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आमच्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,”असा टोला कोश्यारी यांनी लगावला आहे.

कोश्यारी पुढे म्हणाले की, अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. ते अतिशय हुशार आहेत. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. मला कधीकधी अजित पवारांची दया येते.  प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं.

 

दरम्यान कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टिप्पणी केली आहे. कोश्यारी म्हणाले की, शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या