मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagatsingh koshyari:‘या’ कारणामुळे महाआघाडीच्या १२ आमदारांची नियुक्ती केली नाही, कोश्यारींचा खुलासा

Bhagatsingh koshyari:‘या’ कारणामुळे महाआघाडीच्या १२ आमदारांची नियुक्ती केली नाही, कोश्यारींचा खुलासा

Feb 20, 2023, 08:28 PM IST

  • विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी  महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना का मंजुरी दिली नाही, याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

Bhagatsingh koshyari on mlc

विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना का मंजुरी दिली नाही, याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

  • विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी  महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना का मंजुरी दिली नाही, याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदाराच्या नियुक्तीचा वाद चांगलाच पेटला होता. महाआघाडीच्या नेत्यांनी यावरून राज्यपालांवर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानपरिषदेसाठी १२ आमदारांच्या जागांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या जागांसाठी नावं पाठवली होती. मात्र, पदावरून पायउतार होईपर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी या १२ आमदारांबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकदा कोश्यारींवर टीकास्र डागलं होतं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या यावर आता भगतसिंह कोश्यारींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालपदाच्या शेवटपर्यंत निर्णय का घेतला नाही? या प्रश्नावर भगतसिंह कोश्यारींनी सांगितले की, याबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळ मला नेहमी भेटायला येत होती. त्यांना मी उद्धव ठाकरे सरकारने लिहिलेले पाच पानांचं पत्र दाखवलं. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पत्र लिहून तुम्ही राज्यपालांना धमकी देत कायदे सांगता व शेवटी लिहिता की, १२ जणांच्या नावांना १५ दिवसांत मंजुरी द्या. 

असं कुठल्या घटनेत लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगतात  या मुदतीत नावांना मंजुरी द्या. कधीतरी ते पत्र समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. सरकारच्या प्रस्तावावर दुसऱ्याच दिवशी मी सही करणार होतो, मात्र या पत्रामुळे मी नावे प्रलंबित ठेवली, असं भगतसिंह कोश्यारींनी खुलासा केला आहे. 

उद्धव ठाकरे संत माणूस आहेत. बिचारे कुठं राजकारणात पडले. माणूस जर सरळमार्गी, सज्जन नसता, राजकारणी असता, शरद पवारांसारख्या राजकारणातील ट्रिक माहिती असत्या, तर असं लिहलं असतं का? चार ओळीत लिहून पाठवलं असतं. तर, सही करणं मला भाग पडलं असतं, असं भगतसिंह कोश्यारांनी म्हटलं आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख संत माणूस असा केला आहे, मात्र आमदार येऊन सांगायचे की, ते शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले आहेत.  उद्धव चांगले माणूस होते मात्र त्यांच्या सल्लागार कोण होते, ज्यांच्यामुळे ते अडचणीत अडकले व त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ असल्याचा घणाघात भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

पुढील बातम्या