मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना भीषण अपघात, मायलेकाचा जागीच मृत्यू

Beed Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना भीषण अपघात, मायलेकाचा जागीच मृत्यू

Dec 19, 2023, 05:59 PM IST

  • car and Tractor Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेताना कार व ट्रॅक्टरचा झालेल्या भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

Beed Accident

car and Tractor Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेताना कार व ट्रॅक्टरचा झालेल्या भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

  • car and Tractor Accident : विष प्यायलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेताना कार व ट्रॅक्टरचा झालेल्या भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

बीडमध्ये कार व ट्रॅक्टरची धडक होईन मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड परळी महामार्गावरील मैदा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विष प्यायलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेताना आईसह मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

रत्नमाला केशव पवार (वय ४१) व प्रदीप केशव पवार (वय २४ रा.  उपळी ता. वडवणी) अशी मृत मायलेकांची नावं आहेत. नितीन सुभाष वेताळ, अनुसया सुभाष वेताळ,  प्रमोद देविदास चव्हाण अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. 

कार व ट्रॅक्टरची धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला तसेच ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत. ट्रॅक्टरला धडकून कार रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पलटली. जखमींवर बीड येथे दवाखान्यात उपचार आहेत.

तीन जखमींपैकी एकाने विष प्यायले होते. अत्यवस्थ अवस्थेत त्याला कारने रुग्णालयात नेले जात होता. भरधाव वेगाने जात असताना परळी मार्गावरील मैदा फाट्याजवळ कार ट्रॅक्टरवर आदळली. यात कारमधील मायलेकाचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विष प्यायल्यामुळे ज्याला रुग्णालयात नेले जात होते, तो या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

विषारी औषध घेतलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वजण कारने बीड जिल्हा रुग्णालयाकडे निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला व माय-लेकाचा मृत्यू झाला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या