मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Accident : माजलगावात कार व मोटारसायकलची भीषण धडक, एकाच गावातील तीन तरुण ठार

Beed Accident : माजलगावात कार व मोटारसायकलची भीषण धडक, एकाच गावातील तीन तरुण ठार

Feb 02, 2023, 12:14 AM IST

  • Beed accident : बीड जिल्ह्यातील माजलगाव-तेलगाव मार्गावर कार व दुचाकीची झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाला. तिन्ही मृत तरुण एकाच गावातील होते.

Beed Accident

Beed accident : बीड जिल्ह्यातील माजलगाव-तेलगाव मार्गावर कार व दुचाकीची झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाला. तिन्ही मृत तरुण एकाच गावातील होते.

  • Beed accident : बीड जिल्ह्यातील माजलगाव-तेलगाव मार्गावर कार व दुचाकीची झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाला. तिन्ही मृत तरुण एकाच गावातील होते.

बीड जिल्ह्यातील माजलगाव – तेलगाव मार्गावर बुधवारी संध्याकाळी स्विप्ट कार आणि दुचाकीचा  भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तीन तरुण  कापूस जिनिंगवर काम करत होते.  लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३२), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३०) आणि आण्णासाहेब बळीराम खटके अशी मृतांची नावे असून तिघेही लहामेवाडी गावातील तरुण होते.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

माजलगाव - तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये लहामेवाडी येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण उपचारादरम्यान मृत पावला. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान, हा भीषण अपघात झाला. 

मृत तरुण तेलगाव येथील कापूस जिनिंगमध्ये काम करत होते. ते दररोज दुचाकीने कामाला ये जा करत होते. आज रात्री कामावरून परत असताना त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन  तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान दम तोडला. 

एकाच गावातील तीन तरुणांचा अपघात मृत्यू झाल्यामुळे माजलगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या