मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Gangrape: बीडमध्ये आठ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, तिन्ही आरोपी अल्पवयीन

Beed Gangrape: बीडमध्ये आठ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, तिन्ही आरोपी अल्पवयीन

Dec 05, 2023, 03:41 PM IST

    • Beed Shivajinagar Gangrape: बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
Gangrape

Beed Shivajinagar Gangrape: बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

    • Beed Shivajinagar Gangrape: बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

Beed Gangrape News: बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली. एका आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिन्हीही मुले अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेने संपू्र्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाणाच्या हद्दीतील एका हॉटेलच्या बाजूने एक व्यक्ती जात होता. त्यावेळी त्याला एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्याने हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या खोलीकडे जाऊन पाहिले असता धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित व्यक्तीने मुलीची सुटका करुन तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव जाऊन पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन पीडिताला वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तिन्ही मुलांच्या पालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबईत शिकवणीच्या बहाण्याने शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत लज्जास्पद कृत्य

मुंबईच्या अँटॉप हिल येथून ट्यूशनच्या शिक्षकाने शिकवणीला आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लज्जास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात वियनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या