मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Murder : मुंबई हादरली! संपत्तीसाठी पोटच्या मुलानं केला आईचा निर्घृण खून, मृतदेह नदीत फेकला

Mumbai Murder : मुंबई हादरली! संपत्तीसाठी पोटच्या मुलानं केला आईचा निर्घृण खून, मृतदेह नदीत फेकला

Dec 08, 2022, 12:52 PM IST

  • Mumbai Murder case : मुंबई एका हत्याकांडाने हादरले आहे. एका मुलाने संपत्तीच्या लालसेपोटी आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

वीणा गोवर्धनदास कपूर

Mumbai Murder case : मुंबई एका हत्याकांडाने हादरले आहे. एका मुलाने संपत्तीच्या लालसेपोटी आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Mumbai Murder case : मुंबई एका हत्याकांडाने हादरले आहे. एका मुलाने संपत्तीच्या लालसेपोटी आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबई : मुंबईत एका मुलाने संपत्तीच्या लालसेपोटी आपल्या आईंचा बॅटने मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी मुलाने नोकराच्या साह्याने आईचा मृतदेह बॅगेत भरुन तो माथेरान येथील नदीत फेकून दिला. यानंतर त्याने स्वत: आई हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली, अखेर संशय आल्यावर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

वीणा गोवर्धनदास कपूर (वय ७४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी त्यांचा धाकटा मुलगा सचिन कपूर आणि नोकर छोटू ऊर्फ लालकुमार मंडह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीणा गोवर्धनदास कपूर या जुहूच्या गुलमोहर रोड क्रमांक ५ येथील गरीबदास सोसायटीमध्ये (कल्पतरू सोसायटी) राहतात. त्या हरवल्याची तक्रार सिक्युरिटी सुपयवायझर म्हणून काम करणारे जावेद अब्दुला मापारी यांनी केली. त्यानुसार हरवल्याची तक्रार ७ डिसेंबर रोजी दाखल करत जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवार, उपनिरीक्षक नरवडे यांनी तपास सुरू केला.

पोलिस मापारी यांच्या तक्रारीनुसार सोसायटीत गेले. त्याठिकानी त्यांनी मापारी यांच्याकडे अधिक चौकशी केली. तसेच वीणा यांच्या घरच्यांची माहिती देखील घेतली. वीणा यांचा मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्या धाकटा मुलगा सचिन याच्यासोबत राहतात. सचिन आणि वीणा यांच्यात संपत्तीवरून वाद होता. यावरुन सचिन हा कोर्टात गेला होता. दरम्यान, पोलिसांची संशयाची सुई ही सचिनकडे गेली. त्यांनी वीणा आणि सचिन यांचे मोबाईल लोकेशन तपासले.तेव्हा वीणा यांचे जुहू तर सचिन याचे लोकेशन पनवेल दाखवले. त्यानंतर सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ डिसेंबरला सकाळी ७ वाजता सचिन आणि छोटू ऊर्फ लालकुमार मंडह हे माउली इमारतीच्या फ्लॅट २०३ मध्ये आल्याचे आढळले.

यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आईचा खून संपत्तीच्या वादातून केला असल्याचे कबूल केले. संपत्तीवरून वाद झाल्याने सचिनने हाताने व बेसबॉल बॅटने वीणा यांना मारहाण करून त्यांची हत्या केली.

हत्या केल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने वीणा यांच्या मृतदेह हा एका बॅगेत कोंबला. तसेच घरातील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर देखील नष्ट करत तो देखील बॅगेत भरला. आणि हा मृतदेह त्याने नोकर छोटू याच्या मदतीन रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे दरीमध्ये फेकल्याचे सांगितले. दरम्यान, वीणा कपूर यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या