मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati : २०२४ मध्ये बारामतीचा खासदार भाजप-सेना युतीचा असेल, बावनकुळेंचे राष्ट्रवादीला थेट आव्हान

Baramati : २०२४ मध्ये बारामतीचा खासदार भाजप-सेना युतीचा असेल, बावनकुळेंचे राष्ट्रवादीला थेट आव्हान

Sep 06, 2022, 08:20 PM IST

    • बारामतीचा पुढचा खासदार हा भाजप-सेना युतीचा असेल, अशा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी शरद पवारांना दिला आहे.
बावनकुळेंचे राष्ट्रवादीला थेट आव्हान

बारामतीचा पुढचा खासदार हा भाजप-सेना युतीचा असेल, अशा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule)यांनी शरद पवारांना दिला आहे.

    • बारामतीचा पुढचा खासदार हा भाजप-सेना युतीचा असेल, अशा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी शरद पवारांना दिला आहे.

बारामती – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप राष्ट्र निर्मितीचे काम करत आहे. पुढच्या निवडणुकीत विधानसभा व लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करायचे आहे. बारामतीचा पुढचा खासदार (Baramati Lok Sabha Constituency ) हा भाजप-सेना युतीचा असेल, अशा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी शरद पवारांना दिला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

भाजपने लोकसभा निवडणुकीला १७ महिन्यांचा काळ शिल्लक असताना आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये भाजपचे कमळ फुलवण्यासाठी भाजपने (Baramati Lok Sabha Constituency ) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीत राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला.

बावनकुळे हे मंगळवारी पुर्ण दिवस बारामती दौऱ्यावर आले आहेत. यावेळी काटेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीला आव्हान दिले. यावेळी आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब गावडे, वासुदेव काळे, रंजन तावरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे आदी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे  म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात  आजपर्यंत झालेल्या लढतीपैकी सर्वात प्रभावी लढत २०२४ मध्ये होईल. 

यावेळी बावनकुळे पुढे म्हणाले, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, आम्ही संन्याशी नाही. भाजप राज्यातील सर्व ठिकाणी निवडणूक लढणार आहे. कार्यकर्त्यांना ताकत देण्याची आमची जबाबदारी आहे. देशातील भाजप एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत देखील आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भुमिका आहे. त्याबाबतची तयारी आमची असणार आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमचा ‘क्लीअर अजेंडा’ भाजप—सेना युती बारामतीत जिंकेल. भाजप कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीतून अनेकजण भाजपात येतील -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बाबी जनतेला पटत नाहीत. त्यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करतील. यावेळी संपूर्ण देशात ४०० पेक्षा अधिक, तर राज्यात बारामतीसह सर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून येतील. बारामती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे. भाजप बारामतीची लढाई जिंकण्यासाठी लढणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

देशात ४०० राज्यात ४५ चे लक्ष्य -

दोन महिन्यात संपूर्ण राज्यात दौरा करणार आहे. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी करणार आहे. देशात ४०० पेक्षा अधिक, राज्यात ४५ अधिक लोकसभा आणि बारामतीसह २०० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा संघटन शक्तीच्या बळावर प्रचंड ताकतीने निवडुन आणणार असल्याचे बावणकुळे म्हणाले. जनता धोकेबाजांना बाजुला करुन हिंदुत्वाचे खरे रक्षण करणाऱ्यांना मदत करेल, असा विश्वास आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना आणि देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

...बारामतीचा  बालेकिल्ला उध्वस्त होणे काही विशेष नाही -

देशात बडे राजकीय किल्ले उद्धवस्त झाले आहेत, त्यात काही मोठे नाही. उपेक्षित लोकांसाठी भाजप काम करीत आहे. देशात जनता निर्णय घेते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच केवळ देश मजबूत करु शकतात, हे जनतेला समजले आहे. त्यामुळे देशात अनेक राजकीय किल्ले उध्द्वस्त होतील. त्यामुळे बारामतीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानाने फारसा मोठा नसल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या