मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasaheb Thackeray Jayanti Live: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

Balasaheb Thackeray Jayanti Live: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

Jan 23, 2023, 09:08 PM IST

  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७वी जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Balasaheb Thackeray

Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७वी जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७वी जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Shiv Sena Rally at Shanmukhanand on the occasion of Balasaheb Thackeray Jayanti : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७वी जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

 

बाळासाहेब ठाकरे जयंती लाइव्ह अपड्टेस:

  • बाळासाहेबांनी सर्वसामन्यांचे सरकार आणले- एकनाथ शिंदे
  • बाळासाहेबांनी कधीच आपल्या विचारांसाठी तडजोड केली नाही- एकनाथ शिंदे
  • बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन आम्ही पुढे जात आहे. शब्द पाळणे हेच आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो आहे- एकनाथ शिंदे
  • हा एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला आहे, असे बोलत त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला, ठाण्याने शिवसेनेला पहिला सत्ता दिली- एकनाथ शिंदे
  • अन्याविरोधात लढण्याची ताकद आणि धाडस बाळासाहेबांकडून मिळाले- एकनाथ शिंदे
  • विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे, दुर्मिळ क्षण आहे- एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीसानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगताला सुरुवात सुरुवात केली.
  • बाळासाहेबांनी कधीच जातपात पाहिले नाही. वेगळेपण दाखवणारे नेते अशी बाळासाहेबांची ओळख होती- देवेंद्र फडणवीस
  • बाळासाहेबांना या सभागृहाचा मोह कधीच नव्हता, त्यांनी ठरवले असते तर ते राज्याचे मुख्यमंत्री बनू शकले असते- देवेंद्र फडणवीस
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी सभागृहात विनंती केली होती. आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही राहुल नार्वेकर याचे आभारी आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोगत व्यक्त करण्यासाठी आले आहेत.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे.
  • बाळासाहेबांच्या कृतीतून संंस्कार वेचत गेलो- राज ठाकरे
  • बाळासाहेब ठाकरे घरात वेगळे आणि बाहेर वेगळे अस कधीच झाले नाही- राज ठाकरे
  • वारसा वस्तूंचा नसतो, विचारांचा असतो. मी विचारांचा वारसा जपला आहे- राज ठाकरे
  • बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलायला सुरुवात केलीय.
  • पक्ष सोडल्यानंतरही विचारपूस करण्यासाठी बाळासाहेब फोन करायचे. त्यांनी आमची आई-वडिलांपेक्षा जास्त काळजी घेतली- नारायण राणे
  • अनेकांना डावलले आणि नारायण राणेला मुख्यमंत्री करण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले. बाळासाहेबांची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. त्यांचासारखा दुसरा नेता होणे शक्य नाही- नारायण राणे
  • बाळासाहेब हवे होते असे आजही वाटत आहे, आम्हाला बाळासाहेबांचे वेड होते- नारायण राणे
  • बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
  • मुंबई आमची मातृभूमी आहे. मुंबईवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाहीत. मुंबईला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी समजणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत- उद्धव ठाकरे
  • देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे- उद्धव ठाकरे
  • मोदी असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मत मिळवता येऊ शकत नाही- उद्धव ठाकरे
  • दुसऱ्यांचे वडील चोरता चोरता स्वत:चे वडील कोण? हे लक्षात ठेवा- उद्धव ठाकरे
  • षण्मुखानंद सभागृहात शिवसेना मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. गद्दार विकत घेता येतात, पण गर्दी विकत घेता येणार नाही,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
  • माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या मेळाव्याला सुरुवात झाली असून या कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
  • विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून अभिनेता प्रसाद ओक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या सोहळ्याची राष्ट्रगीताने सुरुवात झाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गैरहजर आहेत.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हजेरी लावली आहे.
  • विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे थोड्याच वेळात (सायंकाळी ६ वाजता) अनावरण होणार आहे.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, "एकही क्षण असा जात नाही की, बाळासाहेबांची आठवण येत नाही. सर्वसामान्यांना न्याय देणे ही बाळासाहेबांची शिकवण घेऊनच आम्ही पुढे चालत आहोत. कमी कालावधीत आम्ही जे काही निर्णय घेतले ते त्यांच्याच शिकवणीमुळे शक्य झाले."
  • नाशिकमध्ये शिवेसेना माजी महापौर यांच्या शिवसेवा मित्र मंडळाने ११ हजार १११ लाडूंचा प्रसाद तयार केला असून त्याचे वाटप केले जाणार आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. "बाळासाहेब झालेल्या विविध संवादांचा मी नेहमीची आदर करेल. त्यांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले", असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे. “स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत व कुंचल्यात सामाजिक व राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याचे सामर्थ्य होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!” अशा शब्दात शरद पवारांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

  • बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.
  • एकनाथ शिदेंच्या गटाकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात 'बाळासाहेबांच्या लेकी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  • बाळासाहेबांची जयंती आणि सामनाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा होणार आहे. 
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी कुलाबा रिगल सिनेमा सर्कल येथील बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना यांच्या जयंती निमित्त कुलाबा रिगल सिनेमा सर्कल येथील बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी कुटुंबासह येणार आहेत. 
  • शिवसेनेतील ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी १ वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर नाटक येतंय. 'बाळासाहेबांचा राज' या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ आज मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात दुपारी ४.३० वाजता होणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं या नाटकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या विशेष सहकार्याने हे नाटक सादर केलं जाणार आहे.
  • विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावले जाणार आहे. आज संध्याकाळी मोठा कार्यक्रम घेत तैलचित्राचं अनावरण केलं जाणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आलंय. चित्रकार चंद्रकला कदम यांनी हे तैलचित्र साकारलं आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं.
  • शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम. शिवसैनिकांमध्ये उत्साह.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या