मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu On NDA : पंतप्रधान मोदींसोबत बैठकीत होतो, पण NDA सोबत असल्याचं गृहीत धरू नये; बच्चू कडूंनी केलं स्पष्ट

Bachchu Kadu On NDA : पंतप्रधान मोदींसोबत बैठकीत होतो, पण NDA सोबत असल्याचं गृहीत धरू नये; बच्चू कडूंनी केलं स्पष्ट

Jul 19, 2023, 07:33 PM IST

  • Bachchu kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते एनडीएमध्ये सामील झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. बच्चू कडूंनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bachchu kadu

Bachchukadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते एनडीएमध्ये सामील झाल्याचीचर्चा राजकीय वर्तुळात होती. बच्चू कडूंनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Bachchu kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते एनडीएमध्ये सामील झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. बच्चू कडूंनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मंगळवारी दिल्लीत एनडीएतील घटक पक्षातील नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित राहिलेले आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी दिल्लीतील बैठकीला हजर होतो याचा अर्थ मी एनडीएसोबत आहे, असे कुणीही गृहीत धरू नये. एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी म्हटले की मी राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हा त्याग केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिल्लीत भाजप पुरस्कृत एनडीए घटक पक्षांची बैठक पार पडली. यावेळी ३८ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं तसेच आगामी निवडणुकीत एनडीएला ५० टक्के मते मिळण्याचा विश्वासही मोदींनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. त्या बैठकीला राज्यातून बच्चू कडू यांच्यासह शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्या जनसुराज्य पक्षाचा समावेश होता. प्रहारचे आमदार बच्चू कडू या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते एनडीएमध्ये सामील झाल्याचीचर्चा राजकीय वर्तुळात होती. बच्चू कडूंनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बच्ची कडू म्हणाले की, एनडीएसोबत आहोत असं लोक गृहीत धरू शकतात. मात्र आम्ही कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय पुढील रणनीती जाहीर करणार नाही. आमचा पक्ष छोटा आहे, चुकीचा निर्णय होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पुढील दहा दिवसांमध्ये एनडीए संदर्भात आमचा अंतिम निर्णय होईल.

आजवर मी कधीही कुणाचा पाठिंबा घेतला नाही. कुणाला पाठिंबा दिला नाही. मी स्वतंत्र लढलेलो आहे. सरकार आणि निवडणूक यात फरक असतो. सरकारमध्ये सहभागी होताना, आम्ही आमच्या मतदारसंघाच्या सोयीने सहभागी झालो. भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी आम्हाला गृहीत धरावे किंवा धरू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही काय पाऊल पुढे टाकावं तो आमचा निर्णय आहे, असे कडू म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या