मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu : भारतरत्न परत करा; सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आमदार बच्चू कडू यांचं जोरदार आंदोलन

Bachchu Kadu : भारतरत्न परत करा; सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आमदार बच्चू कडू यांचं जोरदार आंदोलन

Aug 31, 2023, 12:44 PM IST

  • bachchu kadu protest against Sachin Tendulkar : आमदार बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी आज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर निदर्शनं केली.

Bachchu Kadu Protest

bachchu kadu protest against Sachin Tendulkar : आमदार बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी आज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर निदर्शनं केली.

  • bachchu kadu protest against Sachin Tendulkar : आमदार बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी आज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर निदर्शनं केली.

bachchu kadu protest against Sachin Tendulkar : ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीतून सचिन तेंडुलकर यानं माघार घ्यावी, अशी मागणी करत प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी आज सचिनच्या मुंबईतील घरासमोर निदर्शनं केली. जाहिरातीतून माघार घ्या किंवा भारतरत्न परत करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

ऑनलाइन गेमिंग हा एक प्रकारचा जुगार आहे. त्यामुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अनेक राज्यांत बंदी असलेल्या या खेळाला सचिन तेंडुलकर यांनी प्रोत्साहन देऊ नये अशी मागणी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी केली होती. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. सचिन यांच्याकडून त्यांच्या मागणीला काहीच प्रतिसाद न आल्यानं आज कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या घरावर धडक देत आंदोलन केलं.

Amravati Murder Case : बायकोशी भांडणं बेतलं जीवावर; सासरच्या लोकांकडून जावयाचा मान पिरगळून खून

बच्चू कडू आणि त्याचे समर्थक घोषणांचे फलक घेऊन सकाळीच सचिनच्या घरावर धडकले.  भारतरत्न नाही, मी तर जुगाररत्न… आम्हाला जुगार खेळून लाखोचे कर्ज करून घ्यायचे आहे, कृपया भीक द्या… चला तरुणांनो, माझ्यासोबत जुगार खेळा… लहान असो किंवा थोर, जुगाराची सवय लावून घ्या… अशा आशयाचे फलक आंदोलकांनी झळाकवले. यावेळी सचिन विरोधी घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन आवरतं घेण्यात आलं.

आंदोलनानंतर मीडियाशी बोलताना सचिन तेंडुलकरवर टीका केली. ‘सचिन तेंडुलकर हे भारतरत्न असल्यामुळं आम्ही हे आंदोलन करतोय. ते फक्त क्रिकेटपटू असते तर आम्हाला आंदोलन करायची गरज नव्हती. मात्र, ते भारतरत्न आहेत. त्यांच्याकडं नवी पिढी आदर्श म्हणून पाहते. या देशात भगतसिंह, अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्यांना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. ज्यांना भारतरत्न मिळाला त्यांनी गैरफायदा का घ्यावा? सचिन यांना जाहिरात करायचीच असेल त्यांनी आधी भारतरत्न परत करावा, अशी मागणी कडू यांनी केली. 'त्यांनी भारतरत्न परत केल्यास मटक्याचीही जाहिरात करावी, तीही सोडू नये, असा संताप कडू यांनी व्यक्त केला.

Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

…तर गणेशोत्सवात सचिनसाठी भीकपेटी

एक क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकर यांचा आम्हाला अभिमानच आहे, पण भारतरत्न सचिन यांनी ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणं योग्य नाही. त्यांनी एकतर भारतरत्न परत करावा किंवा जाहिरातीतून बाहेर पडावं. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळाजवळ तेंडुलकर यांच्या नावानं भीकपेटी व सूचना पेटी लावण्यात येईल, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या