मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu : 'वाटोळं करेन' म्हणणारे बच्चू कडू अचानक नरमले! म्हणाले, प्रार्थना ऐकून मत बदललं!

Bachchu Kadu : 'वाटोळं करेन' म्हणणारे बच्चू कडू अचानक नरमले! म्हणाले, प्रार्थना ऐकून मत बदललं!

Jul 13, 2023, 01:00 PM IST

  • bacchu Kadu on minister post : मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना इशारे देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आता नरमले आहेत.

Bachchu Kadu

bacchu Kadu on minister post : मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना इशारे देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आता नरमले आहेत.

  • bacchu Kadu on minister post : मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना इशारे देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आता नरमले आहेत.

Bachchu Kadu on minister post : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या रूपानं नवा भिडू सामील झाल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपासह मंत्रिमंडळाचा विस्तारही लटकला आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची नाराजी समोर येत आहे. बच्चू कडू यांचं नाव नाराजांमध्ये आघाडीवर होतं. मात्र, आता अचानक त्यांनी माघार घेतली आहे. या माघारीसाठी त्यांनी अनेक कारणं दिली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

राष्ट्रवादीच्या गटाच्या सरकारमधील सहभागामुळं संधी हुकणार असल्यानं भाजप व शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू यांना याबाबत विचारलं असता मी नाराज नाही, पण नाराज झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. मंत्रिपदाच्या संभाव्य यादीत नाव नसल्याची शक्यता दिसताच त्यांनी पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर त्यांनी माघार घेतली आहे.

‘एकनाथ शिंदे यांनी मला १७ तारखेला भेटायला बोलावलं आहे. त्यानंतर मी पुढील निर्णय सांगणार आहे. मात्र, आताच्या परिस्थितीत मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगासाठी मंत्रालय तयार करून मोठं काम केलं आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन. सामान्य माणसासाठी झटणारे ते मुख्यमंत्री आहेत. आज ते पेचात आहेत. त्यांना अडचण होऊ नये. कोणा-कोणाला पद देणार? अशावेळी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं आहे, असं कडू म्हणाले.

सामान्यांसाठी काम करायचंय!

‘वैयक्तिक पदासाठी नाराज होणारा बच्चू कडू नाही. आमच्या आई-वडिलांनी ते कधी शिकवलं नाही. मला मंत्रिपदाची हाव नाही आणि नसेल. मला कुटुंबासाठी आणि मतदारसंघातही वेळ द्यायचा आहे. पद घेतल्यावर मला लोकांसाठी काम करता येणार नाही. त्यामुळं मी मंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. फक्त ते आज जाहीर करणार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत पुढील भूमिका जाहीर करेन, असं कडू म्हणाले.

प्रार्थना ऐकली आणि मत बदललं!

मंत्री व्हावं असं कोणाला वाटतं नाही. पण काल रात्री मी एक प्रार्थना ऐकली. 'इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना… ही ती प्रार्थना होती. ती ऐकून माझं मत बदललं. मला वाटलं हे सगळं कशासाठी करायचं? पुन्हा त्या रांगेत का बसायचं?,’ असंही कडू म्हणाले.

पुढील बातम्या