मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Ganesh Festival: कोण आला रे कोण आला पुण्याचा सिंघम आला; कोयता गॅंगच्या बिमोडाच्या देखाव्याने वेधले पुणेकरांचे लक्ष

Pune Ganesh Festival: कोण आला रे कोण आला पुण्याचा सिंघम आला; कोयता गॅंगच्या बिमोडाच्या देखाव्याने वेधले पुणेकरांचे लक्ष

Sep 29, 2023, 08:35 AM IST

    • Pune koyta gang : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोयता गॅंगची दहशत वाढली आहे. रोज कुठे ना कुठे या घटना घडत असतात. दरम्यान, पुणे पोलिसांनी कोयता गॅंग विरोधात फास आवळला असून याचा देखावाच एका मंडळाने केल्याने सर्वांचे लक्ष या देखाव्याने वेधले.
Pune koyta gang :

Pune koyta gang : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोयता गॅंगची दहशत वाढली आहे. रोज कुठे ना कुठे या घटना घडत असतात. दरम्यान, पुणे पोलिसांनी कोयता गॅंग विरोधात फास आवळला असून याचा देखावाच एका मंडळाने केल्याने सर्वांचे लक्ष या देखाव्याने वेधले.

    • Pune koyta gang : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोयता गॅंगची दहशत वाढली आहे. रोज कुठे ना कुठे या घटना घडत असतात. दरम्यान, पुणे पोलिसांनी कोयता गॅंग विरोधात फास आवळला असून याचा देखावाच एका मंडळाने केल्याने सर्वांचे लक्ष या देखाव्याने वेधले.

पुणे : पुण्यात अल्पवयीन मुले, तरुणांनी कोयता घेऊन धमकावणे, हल्ले करणे अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या. या गॅंगची मोठी दहशत पुणेकरांमध्ये आहे. रोज या घटना घडत असल्याने यावर कारवाई व्हावी आणि पुण्याला भयमुक्त बनवावे अशी मागणी नागरिक करत होते. यावर पुणे पोलिसांनी मोठी मोहीम राबवून अनेक गॅंगचा सफाय केला. तर अनेकांची धिंड थेट शहरातून काढली. यामुळे या घटनांचे प्रमाण कमी झाले असल्याने पोलिसांचे आभार मननारा एक आकर्षक देखावा वैभव तरुण मंडळाने साकारला होता. या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Manipur Violence : मणीपुर येथे आंदोलकांचा थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला; सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

गेल्या काही महिन्यांत पुण्यात कोयता गँगची मोठी चर्चा आहे. अनेक कोयता गँगवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. याच कोयता गँगचे प्रतिबिंब गणेश विसर्जन मिरवणुकीतही दिसले. वैभव मित्र मंडळाने कोयता गँग बाबत जनजागृतीपर देखावा साकारत पुणे पोलिसांचे कौतुक केले. या देखाव्याने मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले.

Ganesh Visarjan 2023: पुण्याच्या मानाच्या गणपतीचा शाही थाट! गणपतींचे ढोल ताशांच्या निनादात उत्साहात विसर्जन

हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगची राज्यभरात चर्चा झाली. पुण्यात अल्पवयीन मुले, तरुणांनी कोयता घेऊन धमकावणे, हल्ले करत होते. गेल्या काही महिन्यांत अशा खूप घटना घडल्या. शहरातील विविध भागातील कोयता गँगच्या टोळक्याच्या दहशतीने नागरिक बेजार झाले होते.

ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. काही टोळ्यांवर मोक्का तर काहींना थेट शहराबाहेर हद्दपार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कोयता गँगबाबत जनजागृती करण्यासाठी वैभव मित्र मंडळाने थेट देखावा सादर करत पुणे पोलिसांचे कौतुक केले. यात झोन १ चे डीसीपी संदीप गिल यांचे व्यंगचित्र लावून त्यांनी केलेल्या कारवायांचे कौतुक करण्यात आले. एका कोयत्यामुळे आयुष्य बरबाद करू नका, असे संदेश या देखाव्यावर लिहिण्यात आले आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या