मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Weather Update : मुंबईतील तापमानात मोठी वाढ; येणारा आठवडा उकाड्याचा?

Mumbai Weather Update : मुंबईतील तापमानात मोठी वाढ; येणारा आठवडा उकाड्याचा?

Sep 04, 2022, 08:44 AM IST

    • weather update maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाल्यानं लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
maharashtra weather forecast 7 days (HT)

weather update maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाल्यानं लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

    • weather update maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाल्यानं लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

maharashtra and mumbai weather forecast 7 days : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला पावसानं दिलासा दिलेला असला तरी आता उकाड्यानं मात्र हैराण केलं आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये सरासरी तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं आता राज्यातील हवामानाची ही स्थिती पुढील सहा दिवस म्हणजे पुढच्या आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

काय आहे कारण?

महाराष्ट्रात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं वातावरणातली हिट वाढत आहे. सध्या मान्सूनचे वारे कमकुवत झाले असून पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा ढगांच्या निर्मितीसाठी काहीही उपयोग होत नसल्यानं मुंबईत पुढील काही दिवस उष्णतेचे असणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली आहे.

पावसाळी वारे जेव्हा कमजोर होत असतात तेव्हा वातावरणातली उष्णता वाढायला लागते. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही स्थिती राहणार असल्याचंही त्या म्हणाल्या. सध्या मुंबईत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान असल्यानं ते लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता...

विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यांपासून विदर्भात होत असलेल्या पावसामुळं अनेक नद्या-नाल्यांना पूर आला होता. याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता विदर्भात पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानं चिंता वाढल्या आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या