मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai High Court: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावर आज हायकोर्टात सुनावणी!

Mumbai High Court: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावर आज हायकोर्टात सुनावणी!

Aug 23, 2022, 09:08 AM IST

    • Mumbai High Court On Name Change Politics : उद्धव ठाकरेंनी मविआ सरकार कोसळण्यापूर्वी दोन्ही शहरांचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ठाकरेंचा निर्णय रद्द करून नव्यानं आदेश काढला होता.
Mumbai High Court (HT_PRINT)

Mumbai High Court On Name Change Politics : उद्धव ठाकरेंनी मविआ सरकार कोसळण्यापूर्वी दोन्ही शहरांचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ठाकरेंचा निर्णय रद्द करून नव्यानं आदेश काढला होता.

    • Mumbai High Court On Name Change Politics : उद्धव ठाकरेंनी मविआ सरकार कोसळण्यापूर्वी दोन्ही शहरांचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ठाकरेंचा निर्णय रद्द करून नव्यानं आदेश काढला होता.

Mumbai High Court On Name Change Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानं त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं हा ठाकरेंनी घेतलेला निर्णय रद्द करत त्याबाबतचा आदेश नव्यानं काढला होता. त्यामुळं या दोन्ही शहरांचं नाव बदलण्यात आलं होतं. परंतु आता सरकारच्या या निर्णयांविरोधात आता मुंबईच्या हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आज न्यायालय काय निकाल देणार, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इस्माईल मसूद यांच्यासह १६ जणांनी राज्यातील या दोन शहरांच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली असून वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तळेकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की, १९९८ साली उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं होतं, परंतु हा निर्णय २००१ मधील तात्कालीन राज्य सरकारनं मध्ये रद्द केला होता. यावेळीही औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूनं घेण्यात आला असून तो केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे, राज्यात सत्ताबदल झाल्यानं हा निर्णय घेता येणार नाही, याशिवाय राज्य सरकारचा हा निर्णय संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात असून या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती द्यावी, अशी मागणी तळेकर यांनी कोर्टाकडे केली आहे. आता त्यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

नामांतरावरून पुन्हा पेटणार राजकीय वादंग...

राज्यातील दोन शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर त्याला AIMIM आणि सपानं विरोध केला होता. याशिवाय औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत मोर्चादेखील काढला होता. ठाकरे सरकारनं जाता जाता नामांतराचा निर्णय घेतल्यानं शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी सपाच्या दोन आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळं आता मुंबई हायकोर्ट औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देणार की निर्णय कायम ठेवणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

पुढील बातम्या