मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aditya Thackeray : कंत्राटदारांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी होतेय; आदित्य ठाकरेंचा सरकारवर आरोप

Aditya Thackeray : कंत्राटदारांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी होतेय; आदित्य ठाकरेंचा सरकारवर आरोप

Feb 04, 2023, 06:07 PM IST

    • Aditya Thackeray : मोदी सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये गुजरातसह कर्नाटकला निधी दिला, परंतु महाराष्ट्राला निधी का दिला नाही?, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं आहे.
Aditya Thackeray On BMC Budget (HT)

Aditya Thackeray : मोदी सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये गुजरातसह कर्नाटकला निधी दिला, परंतु महाराष्ट्राला निधी का दिला नाही?, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं आहे.

    • Aditya Thackeray : मोदी सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये गुजरातसह कर्नाटकला निधी दिला, परंतु महाराष्ट्राला निधी का दिला नाही?, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं आहे.

Aditya Thackeray On BMC Budget : मोदी सरकारनं देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. पालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी ५२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पालिकेच्या बजेटवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी एकही मोठा प्रकल्प नाही?, असा सवाल करत शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी पालिकेचा ५२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत ६६७० कोटी रुपये जास्त आहेत. पालिकेनं सादर केलेल्या बजेटमधून मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटदारांसाठी सरकार मोठ्या प्रमाणात जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्र मोरल, लिगल आणि फायनाशियल दिवाळखोरीच्या दिशेनं जात आहे. राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेचे साडेसात हजार कोटी रुपये बाकी आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं पालिकेची थकबाकी तातडीनं द्यावी, अशी मागणी करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई महापालिकेच्या एफडीच्या व्याजातून येणाऱ्या रकमेतून शिवसेनेनं अनेक प्रकल्प पूर्ण केले. जनतेचा पैसा वाचवून आम्ही पालिकेला फायद्यात आणलं. त्यामुळं पालिकेच्या एफडीतून किती पैसा कोणत्या कारणांसाठी वापरत आहे, याचा खुलासा शिंदे-फडणवीस सरकारनं करायला हवा, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. बजेट मांडणारे प्रशासक तेच आणि मंजूरही तेच करणार?, मोदी सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये गुजरातसह कर्नाटकला निधी दिला, परंतु महाराष्ट्राला निधी का दिला नाही?, हे लोकशाहीला धरून आहे का?, मुंबईत २५०० कोटींत होणारे रस्ते ६५०० कोटी रुपयांमध्ये होत आहेत. त्यामुळं आता मुंबईत लोकशाही उरलेली आहे की नाही?, असा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

पुढील बातम्या