मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amruta Fadnavis : शिवराजसिंह पुन्हा सीएम होतायत, देवेंद्रजी होतील का?; अमृता फडणवीस काय म्हणाल्या पाहा

Amruta Fadnavis : शिवराजसिंह पुन्हा सीएम होतायत, देवेंद्रजी होतील का?; अमृता फडणवीस काय म्हणाल्या पाहा

Dec 03, 2023, 03:49 PM IST

  • Amruta Fadnavis on assembly election Results : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis on assembly election Results : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Amruta Fadnavis on assembly election Results : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Amruta Fadnavis on assembly election Results : देशातील पाच पैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सध्या सुरू आहे. तेलंगण वगळता चार पैकी तीन राज्यांत भाजपनं निर्विवाद विजयाकडं वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळं भाजपच्या पाठिराख्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

मुंबईतील एका पार्कच्या उद्घाटनानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. निकालाचा दिवस असल्यानं साहजिकच अमृता फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली गेली. त्यांनी भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. 'भारतीय जनता पक्ष सगळीकडंच नंबर वन राहणार आहे, असं त्या म्हणाल्या.

Telangana Congress : हिंदी पट्ट्यात दणका बसलेल्या काँग्रेसनं तेलंगण कसं जिंकलं? 'ही' आहेत पाच कारणं

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री बनत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. 'महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आहेत. भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून भाजपलाच आणतील एवढंच मी सांगेन, असं अमृता म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस निकालांवर खूष

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील अत्यंत खूष दिसले. त्यांना प्रतिक्रिया विचारली असता तूर्त त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. 'निकालांवर मी अतिशय आनंदी आहे. मी यावर सविस्तर बोलेन, असं ते म्हणाले.

भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण

मागील महिनाभरात देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण व मिझोराम या पाच राज्यांत निवडणुका झाल्या. त्यापैकी चार राज्यांची मतमोजणी आज सुरू आहे. तर, उद्या मिझोरामचा निकाल येणार आहे. चार पैकी हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशात सत्ता राखतानाच राजस्थान व छत्तीसगडमधील सत्ता भाजपनं खेचून आणली आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

पुढील बातम्या