मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Padharpur Wari 2023 : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा

Padharpur Wari 2023 : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा

Apr 08, 2023, 08:02 PM IST

  • Ashadhi Padharpur wari 2023 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

Ashadhi Padharpur wari 2023 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

  • Ashadhi Padharpur wari 2023 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

Ashadhi Wari 2023 : महाराष्ट्रातील वारवारी संप्रदायाच्या दृष्टीने आषाढी वारीला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यातील वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागलेली असते त्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली.

कोरोना महामारीत दोन वर्षांच्या खंडानंतर गेल्या वर्षी पारंपरिक पद्धतीने पंढरपूर वारी पार पडली. परंपरेनुसार इनामदार वाड्यात तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे. संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची लाखो विठ्ठल भाविक प्रतीक्षा करत असतात.

यावर्षी आषाढी वारी २९ जून रोजी आहे. यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून १० जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. तर, २८ जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात २९ जूनला तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे.

दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या