मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Padharpur Wari 2023 : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून ११ जून ला प्रस्थान

Padharpur Wari 2023 : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून ११ जून ला प्रस्थान

Apr 11, 2023, 09:22 PM IST

  • Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023 : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे ११ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi

Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023 : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे११जूनला पंढरपूरकडेप्रस्थान होणार आहे.

  • Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023 : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे ११ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Ashadhi Padharpur wari 2023 : महाराष्ट्रातील वारवारी संप्रदायाच्या दृष्टीने आषाढी वारीला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यातील वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागलेली असते त्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर आता ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे ११ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत अनेक दिंड्यातून दाखल होतात. १२ जूनला श्रींची पालखी गांधी वाड्यात दाखल होणार आहे. त्यानंतर पालखी मार्गस्थ होईल, असे देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

१४ जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. १४  व १५ जूनला सासवड मुक्काम , १६ जूनला जेजुरीकडे प्रस्थान, १७ जूनला जेजुरी मुक्काम, १८ जूनला लोणंद येथे सोहळा मुक्काम. १९ जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि २० जूनला तरडगाव, २१ जूनला फलटणकडे प्रस्थान आणि २२ जूनला फलटण मुक्काम, २३ ला नातेपुते, २४ जूनला माळशिरस मुक्काम, २५ जूनला वेळापूर, २६ जूनला भंडी शेगाव, २७ जूनला वाखरी, २८ जूनला पंढरपूर,  २९ जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. ३ जुलै पौर्णिमेपर्यंत माऊली पालखी सोहळा पांढरी नगरीत विसावेल.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या