मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज ठाकरेंची पाठ फिरताच पुण्यात राडा; मनसेचे कार्यकर्ते भिडले!

राज ठाकरेंची पाठ फिरताच पुण्यात राडा; मनसेचे कार्यकर्ते भिडले!

May 19, 2022, 03:56 PM IST

    • पक्ष कार्यालयातच कार्यकर्त्यांचा धुडगूस; पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
राज ठाकरे (HT_PRINT)

पक्ष कार्यालयातच कार्यकर्त्यांचा धुडगूस; पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    • पक्ष कार्यालयातच कार्यकर्त्यांचा धुडगूस; पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

 पुणे : राज ठाकरे हिंदूत्वाच्या मुद्यावरून आक्रमक आहेत. औरंगाबाद येथील सभेनंतर पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी अयोध्या येथे जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्या आधी पुण्यात ते जाहीर सभा घेणार होते. यासाठी ते पुणे दौ-यावर होते. दरम्यान, कार्यकर्ते या सभेची जय्यत तयारी करत होते. या सभेत अयोध्या दौ-यापूर्वी राज ठाकरे कुणावर तोफ डागतात याकडे लक्ष लागून होते. पुण्यात डेक्कन येथील भिडे पुलाजवळ नदीपात्रात ही सभा होणार होती. मात्र, त्या आधीच अचानक पुणे दौरा रद्द करत राज ठाकरे हे मुंबर्ईला निघून गेले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगत तूर्तास हा दौरा रद्द करण्यात आल्याचे बोलले जात होते. 

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

दरम्यान, राज ठाकरे पुण्यातून जाताच अंतर्गत वादामुळे मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. पुण्याच्या मध्यभागी असलेल्या मनसेच्या कार्यालयात बुधवारी रात्री ही घटना घडली. शिवाजीनगर विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या मुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. रात्री सुरू झालेल्या या गोंधळाचे पर्यवसन हमरी तुमरी आणि हाणामारीत झाले.विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर आणि शिरोळे यांच्यात वादाला सुरुवात झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष आहेत. मात्र, पक्षाच्या कोणत्याही बैठकांना का बोलावलं जात नाही, असा प्रश्न थेट विटकर यांनी बैठकीत विचारला. यामुळे शिरोळे यांचा राग अनावर झाला. यामुळे दोघांमध्ये सुरवातीला बाचाबाची आणि नंतर झटापट झाली. 

दरम्यान त्यांचे कार्यकर्ते भडकले. वातावरण तापल्याने धिंगाणा सुरू झाला. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व पदाधिकारी यांच्यासमोरच वाद झाला.दरम्याने गेल्या हाी दिवसांपासून मनसेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. दरम्यान वसंत मोरे पक्षाला जयमहाराष्ट्र करणार होते. त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. पक्षातील अंतर्गत वाद ठाकरे यांच्या पर्यंत पोहचला होता. यामुळे राज ठाकरे हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली. या कारणामुळे पुण्यात होणारी बहूचर्चित सभाही रद्द झाली. दरम्यान राज ठाकरे हे बुधवारी मुंबईला निघाले. मात्र, त्याच रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षकार्यालयातच तुफान राडा घातला. तसेच एकमेकांना मारहाणही केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या