मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayan Raje : सातारा बाजार समितीत उदयनराजेंना पराभवाचा धक्का, शिवेंद्रराजे म्हणाले आता..

Udayan Raje : सातारा बाजार समितीत उदयनराजेंना पराभवाचा धक्का, शिवेंद्रराजे म्हणाले आता..

May 01, 2023, 04:04 PM IST

  • Udayan raje Vs Shivendra raje : सातारा बाजार समितीमधील पराभव खासदार उदयनराजेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले या विजयावर प्रतिक्रिया देत नगरपालिकेतूनही उदयनराजेंना हद्दपार करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Udayan raje Vs Shivendra raje

Udayanraje Vs Shivendraraje : सातारा बाजार समितीमधील पराभव खासदार उदयनराजेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले या विजयावर प्रतिक्रिया देत नगरपालिकेतूनही उदयनराजेंना हद्दपार करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

  • Udayan raje Vs Shivendra raje : सातारा बाजार समितीमधील पराभव खासदार उदयनराजेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले या विजयावर प्रतिक्रिया देत नगरपालिकेतूनही उदयनराजेंना हद्दपार करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

सातारा – साताऱ्यातील दोन राजेंचा वाद सर्वविदित आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत दोन राजे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाने बाजी मारत खासदार उदयनराजे यांच्या गटाला चारीमुंड्या चीत केले आहे. आमदार शिवेंद्रराजे यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकून बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत उदयनराजे यांच्या गटाचा सुपडा साफ केल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी विश्वास व्यक्त केला की, ज्या पद्धतीने बाजार समितीतून हद्दपार केले आहे, तसेच नगरपालिकेतूनही त्यांना हद्दपार केले जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

सातारा बाजार समितीमधील पराभव खासदार उदयनराजेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाची मतदारांनी धुळधाण केली आहे. फक्त पदे भोगायची, लोकांची कामे करायची नाहीत. यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारलं असून उदयनराजेंचा मार्केट कमिटीची जागा हडपण्याचा डाव आम्ही हाणून पाडला आहे.

बाजार समितीमधील विजयानंतर शिवेंद्रराजे म्हणाले की, आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीतही उदयनराजेंना अशाच पराभवाचा सामना करावा लागेल. त्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला जनता वैतागली आहे.

 

उदयनराजेंची मतदारसंघातील ताकत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळली असून या निवडणुकीनंतर खासदारकीच्या संदर्भात भाजपाचे वरिष्ठच आता निर्णय घेतील, असा टोलाही शिवेंद्रराजे यांनी लगावला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या